Satara Rain Update – विकेंडचा प्लॅन करताय; थांबा! घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, पुढचे दोन दिवस पाऊस जोरदार कोसळणार

Satara Rain Update काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा पावसाचे प्रमाण वाढले असून मुंबई वेधशाळेने 24 आणि 25 जुलै असा दोन दिवास साताऱ्यात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच शनिवार (26 जुलै) आणि रविवार (27 जुलै) घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला असून पश्चिम भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडचा प्लॅन करणाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पूर्व भागाच्या तुलनेत जास्त होतो. पंरतु मागील काही दिवसांमध्ये राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होतं. पावसाने एक प्रकारे विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने आपली जोरदा बॅटिंग सुरू केली आहे. मुंबई वेधशाळेच्या तशा सुचना दिल्या असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील घाट परिसरात 24 आणि 25 जुलै असा दोन दिवस रेड अलर्ट दिलेला आहे. आता 26 आणि 27 जुलै रोजी देखील याच घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम भागाला पाऊस चांगलाच झोडपून काढेल अशी शक्यता आहे.

Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय