Satara Vishesh – जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पण त्याचे निकष माहित आहेत का? वाचा…

Satara Vishesh

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच सर्व गणित बिघडून गेलं आहे. मे महिन्यापासून पावसाची सतत संततधार सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत. सरकारने या सर्व गोष्टीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी “आम्ही जावळीकर” चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे.

जावळी तालक्यासह पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाचे आगमन लवकर झाले आहे. तसेच अवकाळी पावसाने धुमशान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसला असून, अद्याप 80 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. विशेषकरून मोरावळे ते बोंडारवाडी, धनकवडी ते भामघर आणि कोयना ते करहर भागातील अनेक गावांमध्ये यावर्षी कडधान्ये, भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही जावळीकर चळवळीच्या सदस्यांनी पुढाकार घेत जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती ना. शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. पुढारी वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिले आहे.

ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो?

महाराष्ट्रात “ओला दुष्काळ” अशी परिभाषित घटना, शुष्क दुष्काळाच्या उलट – जास्त पाऊसामुळे पिकांचे नुकसान होण्याची स्थिती आहे. हे सर्वसामान्य, पण औपचारिक शासकीय दुष्काळ संहितेत समाविष्ट नाही. तरीही काही निकष वापरून सरकार व शेतकरी संघटनांच्या मागण्यांमध्ये याचा उल्लेख होतो.

ओल्या दुष्काळाचे सामान्य निकष

  • अतिवृष्टी – एका दिवसात ≥ 65 mm पाऊस (जो पडल्यावर अतिवृष्टी मानली जाते) 
  • पिकांचे नुकसान – 33 % पेक्षा जास्त नुकसान झाल्यास त्या भागाला ओला दुष्काळग्रस्त मानले जाते .

कोणताही सरकारी “ओला दुष्काळ घोषित” करण्याचा स्पष्ट कायदेशीर मार्ग नाही. परंतु या निकषांनुसार राजकीय व पुढील आयोगाच्या निर्णयांमध्ये आधार घेतला जातो.

Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…