Satara Vishesh – रक्षाबंधननिमित्त सातारकरांना एसटी महामंडळाचा दिलासा, जादा बस सोडणार; जाणून घ्या तारखांची यादी

रक्षाबंधनानिमित्त सातारकरांची (Satara Vishesh) गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत सर्व 11 आगारातून जादा बस सोडल्या जाणार आहेत. 9 तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे मोठ्या संख्येने सर्व मंडळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मुंबई-पुणेमध्ये जात असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे आणि बोरिवली या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते.

मुंबई येथून 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून मुंबई सेंट्रल, सायन, बोरिवली, ठाणे येथून वाई, कराड, कोरेगाव, फलटण, पाटण, दहिवडी, मेढा, वडूज या मार्गावर 25 फेऱ्या होणार आहे.

  • 9 ऑगस्ट रोजी याच मार्गावर 16 फेऱ्या
  • 10 ऑगस्ट रोजी याच मार्गावर 25 फेऱ्या होणार आहेत.

स्वारगेट येथून 8 ऑगस्ट रोजी सातारा, वाई, कराड, फलटण, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर व पुणे स्टेशन या मार्गावर 52 बसेस सोडण्यात येणार आहेत.

  • 9 ऑगस्ट रोजी या मार्गावर 25 बसेस धावतील
  • 10 ऑगस्ट रोजी 52 बसेस धावतील
  • 11 ऑगस्ट रोजी 24 बसेस धावतील

त्याच बरोबर सातारा विभागातील सर्व आगारांमधून 39 बसेससच्या माध्यमातून 196 फेऱ्या होणार आहेत. पुढारीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.