SBI Job Vacancy- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि वयाची अट

बँकिंग क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी (SBI Job Vacancy) मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 33 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात अर्ज करा आणि आपल्या मित्राला आणि गरजूंपर्यंत ही माहिती आवर्जून पोहोचवला. 

अर्ज करण्याची पुढील गोष्टी गरजेच्या आहेत

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा वय ते 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. 
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आता 7 ऑगस्ट 2025 असणार आहे. 

कोणकोणती पद भरली जाणार आहेत 

स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पद भरली जाणार आहेत. या पदांमध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टेंट व्हाईस प्रेसिडेंड आणि जनरल मॅनेजर या पदांचा समावेश आहे. 

अर्ज कुठे करायचा 

अर्ज करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईटला भेट द्या – sbi.co.in