श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत नाहीए आणि काही तरी झटपट पदार्थ खायचे असतील तर पुढील पदार्थ नक्की बनवा-
1. साबुदाणा खिचडी
भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, बटाट्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या व साजूक तूप वापरून खिचडी तयार करता येते. हे एक हलकं आणि पचायला सोपं खाद्य आहे.
2. राजगिऱ्याची पुरी
राजगिऱ्याच्या पीठात उकडलेला बटाटा घालून पुरी तळतात. हे पचायला हलकं व उपवासासाठी योग्य.
3. शिंगाड्याचे थालीपीठ
शिंगाड्याच्या पीठात बटाटा, हिरवी मिरची, मीठ व जिरे घालून थालीपीठ बनवता येतं.
4. साबुदाणा थालीपीठ
साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा आणि हिरव्या मिरच्यांचं मिश्रण करून थालीपीठ बनवता येतं.
5. फळांचं सलाड किंवा फळांचा रस
सजवलेलं फळ सलाड हे उपवासात आरोग्यदायी आणि ऊर्जादायक पर्याय आहे.
6. उपवासाचे वडे (बटाटेवडे)
उकडलेल्या बटाट्यापासून छोटे वडे करून साजूक तुपात तळले जातात. शेंगदाण्याचं कूट घालून चव वाढवता येते.
7. दुधात साबुदाणा किंवा फराळाचे लाडू
साखर, गूळ, सुका मेवा वापरून साबुदाणा खीर किंवा लाडू तयार करता येतात.
Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…
उपवास करताना केवळ श्रद्धा महत्त्वाची नसून, आरोग्याचाही विचार करणे तितकंच आवश्यक आहे.
१. शरीराची तयारी ठेवा
उपवास सुरू करण्यापूर्वी हलका आहार घ्या. एकदम उपाशी राहिल्यास अशक्तपणा, चक्कर येणे शक्य आहे.
२. पाणी भरपूर प्या
उपवासात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी, लिंबूपाणी किंवा ताक पिणं आवश्यक आहे.
३. ताजे व पौष्टिक अन्न घ्या
फराळाचे पदार्थ करताना जास्त तेलकट, तळलेले टाळावेत. शक्यतो उकडलेले, थालीपीठ, फळं, दुधाचे पदार्थ यावर भर द्या.
४. वेळच्या वेळी खा
उपवासात अन्न कमी असते, त्यामुळे वेळेवर काही ना काही खाणं आवश्यक आहे, नाहीतर रक्तदाब कमी होऊ शकतो.
५. सैंधव मीठ वापरा
सामान्य मीठाऐवजी सैंधव (सेंधा) मीठ वापरणे पचनासाठी उपयुक्त ठरते.
६. मधुमेह किंवा इतर आजार असल्यास काळजी घ्या
जर मधुमेह, बीपी, थायरॉईड इत्यादी आजार असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा.
७. पुरेशी झोप घ्या
शरीर थकलेलं असताना उपवास केल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे विश्रांती घ्यावी.
उपवास हा भक्तीचा भाग असला तरी तो शरीराच्या क्षमतेनुसार आणि संतुलनातच करावा. अति उपवास किंवा चुकीचा आहार आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. योग्य नियोजन, पोषणयुक्त फराळ, आणि विश्रांती यामुळे उपवास आरोग्यदायी व आनंददायी ठरतो.