Side Effects of Junk Food – फास्ट फूडचे अतिसेवन; आतड्यांना छिद्र अन् मुलीचा जीव गेला; मुलांसह पालकांनी धडा घ्यावा

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या या धावपळीच्या जीवनशैलीत फास्ट फूड (Side Effects of Junk Food ) हा जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तेलकट, अनहायजेनिक पदार्थांवर सर्रास ताव मारला जातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही तुमचं आयूष्य कमी करण्यात पुढाकार घेत आहात. हल्ली बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत जाताना टिफीनमध्ये सुद्धा फास्ट फुड देत असल्याचे निदर्शनास आलं आहे. सतत फास्ट फुड खाण्याच्या सवयीमुळे एका 16 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फास्ट फुड किती धोकादायक आहे, याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. आपल्या पाल्यांना फास्ट फुड खाण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पालकांचे डोळे या घटनेमुळे झटकन उघडले असतील. 

अहाना नावाची 16 वर्षीय मुलगी आयुष्यामध्ये नवीन भरारी घेण्याच्या तयारीत होती. मात्र, फास्ट फुडच्या सवयीमुळे तिचं स्वप्न अपूर राहिलं आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा शहरातील मोहल्ला अफगाना येथील ती रहिवासी आहे. वडील मन्सूर खान हे शेतकरी होते आणि आपल्या लेकीकडून त्यांनाही खूप अपेक्षा होत्या. अहाना सध्या अकरावीला एका चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. कुटुंबातील सर्वात लहाण मुलगी असल्यामुळे अहाना सर्वांची लाडकी होती. 

अहानाच्या मृत्यूसंदर्भात नातेवाईकांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहानाला फास्ट फूड खाण्याचं प्रचंड व्यसन होतं. मॅगी, पिझ्झा, बर्गर सारखे पदर्थ ती वारंवार खात होती. घरातल्यांनी तिला अनेकवेळा टोकलं सुद्धा, मात्र अहानाला फास्ट फूड खाण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे ती घरातल्यांना न सांगता लपून का होईना फास्ट फूड सेवन करतच होती. फास्ट फूडच्या अति सेवनाचा परिणाम सप्टेंबर महिन्यापासून जाणवू लागला. तिच्या तब्येत बिघडायला सुरुवात झाली. सरुवातीला पोटात तीव्र वेदना होत होत्या. प्राथमिक उपचार करून काही फरक पडला नाही. त्यामुळे तिला 30 नोव्हेंबर रोजी मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. 

डॉक्टरांनी जेव्हा अहानाची तपासणी केली, तेव्हा त्यांना धक्का बसला. फास्ट फूडच्या अति सेवनामुळे अहानाची आतडी एकमेकांनी चिकटली होती. आतड्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पडली होती. फास्ट फूडमुळेच आतड्यांची अवस्था दयनीय झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. चार दिवसांपूर्वी तिची तब्येत पुन्हा बिघडली आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं. सुरुवातीचे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अहाना चालू लागली, फिरू लागली, बोलू लागली. आपली अहाना आता पहिल्या सारखी बरी होणार, असा कुटुंबियांना विश्वास होता. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळं होतं. रविवारी (21 डिसेंबर 2025) अहानाची तब्येत जास्त बिघडली आणि यातच तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. 

लेकीच्या जान्याने अहानाचे कुटुंब पुर्त कोलमडून गेलं आहे. मात्र, अहानाच्या मृत्यूमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. फास्ट फूडच्या अतिसेवन तिच्या जीवावर बेतलं. आजही अशी असंख्य मुलं आहेत जी नेहमी नित्यनियमाने फास्ट फूडवर ताव मारतात. अशा मुलांच्या पालकांनी वेळीच त्याचं हे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यता…

फास्ट फूडचे दुष्परिणाम

तज्ज्ञांच्या मते, फास्ट फूडमध्ये प्रचंड प्रमाणात तेल, मीठ, रसायने आणि संरक्षक घटक (प्रिझर्व्हेटिव्हज) असतात. यामुळे पचनसंस्था कमकुवत होते, आतड्यांवर ताण येतो आणि दीर्घकाळ अतिसेवन केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. विशेषतः किशोरवयात शरीर वाढीच्या टप्प्यात असताना अशा सवयी अधिक धोकादायक ठरतात.

जनजागृतीची गरज

अहानाची घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजासाठी धोक्याचा इशारा आहे. पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे, शाळा- महाविद्यालयांनी आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि तरुण पिढीने चवीपेक्षा आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. फास्ट फूडची सवय वेळेत बदलली नाही, तर त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, हे अहानाच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. निरोगी भविष्यासाठी संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली स्वीकारणं अत्यावश्यक आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना फास्ट फूड खाण्याची सवय आहे का? असेल तर आपल्या सवयी बदला. निरोगी आरोग्याच्या दिशेने एक पाऊल टाका…

error: Content is protected !!