Side Effects of Smoking – चिंताजनक! महिलांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण वाढतंय, वेळीच सावध व्हा.. नाहीतर होतील हे मोठे आजार

Side Effects of Smoking आपल्या देशाला पुरुष प्रधान संस्कृती लाभली. मात्र असं असलं तरी महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व तयार केलं. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यश संपादन केलयं.विविध कंपनीत आता महिलाही उच्च पदावर काम करू लागल्या आहेत. मात्र चिंताजनक बाब म्हणजे यापैकी काही नोकरदार महिलांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण सध्या खूप वाढताना दिसतंय. यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा कल जसा यशाकडे वळतोय तितकाच तो नशेच्या आहारीही जाताना दिसतोय. मग ते फॅशनच्या नावाखाली असो, व्यसन किंवा कामाच्या तणावामुळे असो आजकाल नोकरदार महिलाही सर्रासपणे धूम्रपान करताना दिसतात. दैनंदिन जीवनातील तणावामुळे सुमारे 20% नोकरदार महिलाधूम्रपान करतात आणि या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो.

धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, हे आपल्याला माहिती असलं तरी अनेकजण या सवयीपासून दूर राहत नाहीत. सिगारेट, बिडी, हुक्का किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील धूम्रपानाचे शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. केवळ फुफ्फुसच नाही, तर संपूर्ण शरीर या धुरामुळे त्रस्त होतं.

फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमुख कारण:
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, COPD (श्वसनतंत्राचा आजार), दम्याचे झटके, ब्रॉन्कायटिस यांसारखे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

२. हृदयविकाराचा धोका:
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

३. मेंदूवर परिणाम:
धूम्रपानामुळे मेंदूतील ऑक्सिजनपुरवठा कमी होतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड होणे, आणि एकाग्रतेचा अभाव होतो.

४. दात आणि तोंडाचे विकार:
सिगारेटचा धूर तोंडातल्या पेशींना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे दात पिवळे होणे, हिरड्यांची सूज, वास येणे, व तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

५. गर्भवती महिलांसाठी घातक:
गर्भवती महिला धूम्रपान करत असल्यास किंवा धूराच्या संपर्कात आल्यास गर्भावर परिणाम होतो. अकाली प्रसूती, जन्मत: कमी वजन, बाळामध्ये श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

६. दुसऱ्यांनाही धोका – Passive Smoking:
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपासचे लोकही धुराच्या संपर्कात येतात, ज्यामुळे त्यांनाही वरिल सर्व आजारांचा धोका असतो.

फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठीचे उपाय

1. धूम्रपान बंद करा / टाळा

  • कर्करोगाचा सर्वात मोठा धोका म्हणजे सिगारेट, बिडी, हुक्का यांसारख्या वस्तूंचं सेवन.
  • passive smoking (इतरांच्या धुराचा संपर्क) टाळा.

2. प्रदूषणापासून संरक्षण

  • PM 2.5 आणि इतर हानिकारक कणांपासून बचावासाठी मास्क वापरा.
  • जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी शक्यतो राहणं टाळा.
  • घरामध्येही एअर प्युरिफायर वापरणे फायदेशीर ठरते.

3. आरोग्यदायी आहार घ्या

  • अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहार कर्करोग विरोधात लढतो.
  • आंबट फळं, ब्रोकली, गाजर, बेरीज खा.

4. श्वसनासाठी योग आणि व्यायाम

प्राणायाम, कपालभाति, अनुलोम-विलोम यांसारखे योगाभ्यास फुफ्फुसांची ताकद वाढवतात.

5. वेळीच तपासणी करा

सतत खोकला, दम लागणे, वजन कमी होणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.