Sports News – वेस्ट इंडिजच वादळ शांत होणार! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

Sports News वेस्ट इंडिज म्हटल की आक्रमक खेळाचं प्रदर्शन करणारे तगडे फलंदाज. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्यासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखळे जातात. याच पंक्तीतला एक तगडा अष्टपैलू खेळाडू म्हणजे आंद्रे रसेल. आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचे जाहीर केले आहे. 21 जुलै पासून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीमधील शेवटची मालिका असणार आहे.

ESPNCricInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी पाच सामन्यांची टी-20 मालिका आंद्रे रसेलच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीची शेवटची मालिका असणार आहे. तसेच तो मालिकेतील सर्व पाच सामने खेळणार नाही. मालिकेचा दुसरा सामना 23 जुलै रोजी जमैकामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यांतर तो निवृत्ती घेणार आहे. 37 वर्षीय आंद्रे रसेलने 2010 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. त्याने आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीमध्ये 1 कसोटी सामना खेळाला असून त्यामध्ये 2 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. तसेच 56 वनडे सामन्यांमध्ये 1034 धावा करत 10 विकेट त्याने पटकावल्या आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 84 सामने खेळले असून 1078 धावा आणि 61 विकेट त्याच्या नावावर आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या दोन्ही वेळी आंद्रे रसेल संघाचा महत्त्वपूर्ण भाग होता. आंद्रे रसेलने दोन्ही वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती.