देशातला प्रत्येक विद्यार्थी आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतो. पोलीस, आर्मी, वायुदल अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करून देशसेवा करण्यासाठी लाखो मुलांचा संघर्ष सुरू असतो. यासाठी वर्षोंवर्षे मुलं मेहनत घेतात. काहींना यात यश मिळत तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. असं असलं तरी मनात असणारी देशसेवेची भावना काही केल्या जात नाही. तर हीच देश सेवेची भावना मनात ठेऊन तुम्हालाही आता पोलिसांसोबत काम करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
तुम्हीसुद्धा समाजसेवेतून पोलिसांच्या कामाचा अनुभव घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ‘Student Police Experiential learning Programme’ हा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा एक विशेष उपक्रम आहे. हा विशेष उपक्रम myभारत पोर्टलवर उपलब्ध आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील कॉलेज विद्यार्थी तसेच पोलिसांना मदत करू पाहणारे तरुण या उपक्रमात सहभागी होऊन थेट स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेऊ शकतात.
कायदेशीर आणि गुन्हे तपासाशी संबंधित कौशल्ये – फौजदारी कायदे, गुन्हे तपास, सामान्य कायद्यानुसार प्रक्रिया या विषयांवर आधारित शिक्षण.
वाहतूक नियंत्रण व सार्वजनिक सुरक्षेचे ज्ञान – रस्त्यावरच्या वाहतुकीचे व्यवस्थापन, काय-कायद्यांचे पालन आणि नागरिकांसोबत संवाद कसा करायचा हे शिकवले जाते.
सायबर गुन्हे, मानवी तस्करी आणि कायदा व सुव्यवस्था – डिजिटल जगातील गुन्हे, मानव तस्करी, कायदा-व्यवस्था विषयक जागरूकता यांचा समावेश.
समाजसेवा व प्रतिबद्धतेची जाणीव – सहभागी विद्यार्थी सामाजिक जबाबदारी, समुदायातील सेवा, आणि “चांगले नागरिक” म्हणून वागण्याची समज विकसित करतात.
व्यावहारिक अनुभव – पोलीस ठाण्यावर प्रत्यक्ष काम, विविध विभागातील दैनंदिन कामकाजाची ओळख, आणि पोलिसांची कार्यपद्धती अनुभवण्याची संधी.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
पुणे पोलिसांनीही विद्यार्थी-अभ्यासक्रमासाठी तब्बल 8 दिवसांचे इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केले आहे, ज्यात FIR, आरोपीचे अधिकार, पोलीस व्यवस्था, आणि नागरिकांची भूमिका याविषयी शिकवले जाते.
प्रशिक्षणाचा कालावधी किती ?
- या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना 120 तास अर्थात 30 दिवस प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक दिवशी साधारण 4 तासांचा अनुभव घेतला जातो.
- विद्यार्थी Undergraduate (स्नातकोत्तर) असावेत आणि या कार्यक्रमासाठी कोणतीही अतिरिक्त शुल्क आकारली जात नाही.
कोण पात्र आहे?
- महाराष्ट्रातील कोणतंही कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी/विद्यार्थिनी
- सामाजिक बांधिलकी आणि अनुभव घेण्याची तयारी असलेला
myभारत पोर्टल वर जाऊन साधी नोंदणी करु शकता.