Supreme Court News – भटक्या कुत्र्यांना खायला द्याल तर गोत्यात यालं; स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर, दंडात्मक कारवाई होणार!

प्राण्यांमध्ये कुत्र्याला माणसाचा सगळ्याच चांगला मित्र म्हणून मानाच स्थान आहे. त्यामुळे कुत्रा पाळीव असो किंवा भटका श्वानप्रेमी त्याची आवर्जून काळजी घेतो, आणि त्याला खायला सुद्धा देतो. मात्र, आता भटक्या कुत्र्‍यांना खायला दिल्याच तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसाल, भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक जागांवर, रस्त्यांवर किवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही खायला दिल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेच्या माध्यमातून हा दंड आकारला जाणार आहे. तसेच ज्या कुत्र्यांना पालिकेच्या माध्यमातून पकडण्यात येईल, त्या कुत्र्यांना सुरक्षित निवारागृहात ठेवण्याची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. भटक्या कुत्र्यांचे होणारे हल्ले, अंगावर धावून जाण्याचे प्रमाण आणि लहान मुलांना लक्ष्य केल्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत. त्यामुळे सुप्रीन कोर्टाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

error: Content is protected !!