Trending Marathi – 8 वर्षांनी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट झाली, पोलिसांसह सर्वांचेच डोळे पाणावले; पाहा Video

Trending Marathi बीड पोलिसांनी 8 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट घडवून दिली आहे. 2017 साली वयाच्या 16 व्या वर्षा संबंधित मुलगा हरवला होता. त्यानंतर हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. परंतु त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आई वडीलांनी मुलगा परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल 8 वर्षांनी मुलाची आणि आईची भेट झाली. मुलाला पाहताच आईने त्याला कडकडून मिठी मारली. यावेळी मुलासह सर्वांचेच डोळे पाणावले होते. हा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.