Types of Cyber Attacks – आयुष्यभराची कमाई लंपास होण्याचा धोका! सायबर हल्ल्याचे प्रकार जाणून घ्या आणि सुरक्षित रहा

एक काळ होता जेव्हा मोबाईलचा वापर हा फक्त एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जायचा. त्यामुळे मोबाईलचा वापर अगदीच मर्यादित होता. काळानुरुप तंत्रज्ञानात बदल होत गेले आणि मोबाईलसह लॅपटॉप, कंम्प्युटर सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या हव्या त्या गोष्टी करता येऊ लागल्या. सध्याच्या घडीला माणसाच जीवन हे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इंटरनेट सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.  नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टी एका क्लिकवर घरी येत आहेत. मोबाईल बँकिंग, ईमेल, सोशल मीडिया, ऑनलाईन खरेदी आणि कामकाज सर्व काही ऑनलाईन होत आहे. या सर्व सोयी 24*7 सुरू आहेत, परंतु यासोबतच एक मोठा धोका वाढत चालला आहे, तो म्हणेज सायबर हल्ला (Cyber Attack) आणि त्याच्या प्रकारांमुळे (Types of Cyber Attacks). 

सायबर हल्ला म्हणजे काय? What Is Cyber Attack

सायबर हल्ला म्हणजे थोडक्यात काय तर संगणक, मोबाईल, सोशल मीडिया अॅप्स, नेटवर्क किंवा डिजिटल डिव्हाइसवर अनधिकृतपणे प्रवेश करून सर्व गोष्टी हँडल करणे, डेटा चोरी करणे, सिस्टम बंद पाडणे, आर्थिक नुकसान पोहचवणे, त्या बदल्यात पैशांची मागणी करणे अशा अनेक गोष्टी सध्या सुरू आहेत. त्यामुळे ज्या उपकरणांवर आपण अवलंबून आहोत. तिच उपकरणे आपल्याला मोठा आर्थिक फटका देण्यासाठी कारणीभुत ठरू शकतात. हा सायबर हल्ला (Cyber Attack) एकाच प्रकारे केला जात नाही. त्याचे विविध प्रकार (Types of Cyber Attacks) आहेत. ते प्रकार कोणते, यामुळे आपण कसं अडकू शकतो याची आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत. 

1. फिशिंग हल्ला (Phishing Attack)

फिशिंग हा सर्वात सामान्य आणि धोकादायक सायबर हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये सर्वसामान्य लोकं अगदीच सहत अडकतात. अशा प्रकारचा हल्ला करताना हॅकर्स बनावट इमेल पाठवणे, मेसेज पाठवणे किंवा बनवाट वेबसाईटद्वारे फसवणूक करतात. या बनावट मेसेजच्या मदतीने त्यांच्याकडून पासवर्ड, OTP, क्रेडिट कार्ड नंबर किंवा बँकेची माहिती मागितली जाते. 

उदा. तुम्हाला बँकेकडून मेल आला आहे असं भासवल जात आणि लिंक पाठवली जाते. बऱ्याच वेळा घाबरून किंवा गडबडीत आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि अगदी अलगद हॅकर्सच्या जाळ्यात अडकतो. 

फिशिंग हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • अनोळखी ईमेलमधील लिंक क्लिक करू नका.
  • वेबसाइटचा URL “https://” ने सुरू आहे का ते तपासा.
  • बँका कधीही ईमेलद्वारे पासवर्ड मागत नाहीत.
  • बँकेकडून आलेल्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.
  • बँकेकडून मेसेज आलाच तर, तात्काळ बँकेत जाऊन चौकशी करा. 

2. मॅलवेअर हल्ला (Malware Attack)

Malware म्हणजे “Malicious Software” — हानिकारक सॉफ्टवेअर. यामध्ये व्हायरस, ट्रोजन, वर्म्स, स्पायवेअर यांचा समावेश होतो. हॅकर्स हे प्रोग्राम वापरून तुमच्या संगणकात घुसतात, डेटा चोरतात किंवा सिस्टम क्रॅश करतात. यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

उदा. तुम्ही मोफत सॉफ्टवेअर डाउनलोड करता आणि त्यात लपलेला मालवेअर तुमच्या डिव्हाइसवर इन्स्टॉल होतो. एकप्रकारे आपणच त्यांना हल्ला करण्यासाठी आमंत्रित करतो. 

मॅलवेअर हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • फक्त विश्वासार्ह साईटवरूनच अॅप्स डाउनलोड करा.
  • अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
  • नियमित सिस्टम अपडेट करा.

3. रॅन्समवेअर हल्ला (Ransomware Attack)

हा हल्ला अत्यंत धोकादायक असतो. या हल्ल्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  यामध्ये हॅकर्स तुमचा सर्व डेटा एन्क्रिप्ट (encrypt) करून लॉक करतात आणि मग डेटा परत मिळवण्यासाठी खंडणी (ransom) मागतात.

उदा –  2017 मध्ये “WannaCry” नावाच्या रॅन्समवेअरने जगभरात लाखो संगणक बंद पाडले.

रॅन्समवेअर हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • महत्त्वाचा डेटा नेहमी बॅकअपमध्ये ठेवा.
  • अनोळखी ईमेल अटॅचमेंट उघडू नका.
  • ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

4. सोशल इंजिनिअरिंग हल्ला (Social Engineering Attack)

या प्रकारात हॅकर्स तुमच्याशी थेट संवाद साधून विश्वास संपादन करतात आणि मग गुप्त माहिती काढून घेतात.

उदा. – कोणी तरी स्वतःला बँक अधिकारी सांगून कॉल करतो आणि OTP मागतो.

सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP किंवा पासवर्ड सांगू नका.
  • सरकारी किंवा बँकेचे प्रतिनिधी कधीही अशी माहिती विचारत नाहीत.

Cyber Security Jobs – काळाची गरज असणार क्षेत्र, सायबर सुरक्षेमध्ये कोणकोणत्या नोकऱ्यांचा समावेश आहे? वाचा…

5. DDoS हल्ला (Distributed Denial of Service)

या हल्ल्यात हॅकर्स एखाद्या वेबसाइटवर लाखो बनावट रिक्वेस्ट पाठवतात ज्यामुळे ती साइट क्रॅश होते आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी अनुपलब्ध होते.
हा हल्ला प्रामुख्याने सरकारी, बँकिंग किंवा कॉर्पोरेट वेबसाइट्सवर होतो.

DDoS हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • Web Firewall वापरा.
  • Cloud-based protection services घ्या (जसे Cloudflare).

6. Man-in-the-Middle Attack (MITM)

यात हॅकर तुमच्या आणि सर्व्हरच्या मध्ये येतो. म्हणजे तुम्ही ज्या वेबसाइटला माहिती पाठवता ती आधी हॅकरकडे जाते आणि मग सर्व्हरकडे. त्यामुळे तो तुमचा डेटा चोरू शकतो.

उदा. – सार्वजनिक Wi-Fi वर लॉगिन करताना तुमचा डेटा इंटरसेप्ट केला जाऊ शकतो.

Man-in-the-Middle हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • Public Wi-Fi वर संवेदनशील माहिती टाकू नका.
  • VPN वापरा.

Cyber Security Course Information In Marathi – सायबर सुरक्षा कोर्स

7. SQL Injection Attack

या हल्ल्यात हॅकर्स वेबसाइटच्या डेटाबेसमध्ये घुसतात आणि वापरकर्त्यांची माहिती चोरतात.

उदा. – लॉगिन फॉर्ममध्ये कोड इंजेक्ट करून पासवर्ड किंवा ईमेल्स मिळवणे.

SQL Injection हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • Secure coding practices वापरा.
  • वेबसाइटमध्ये input validation ठेवा.

8. Keylogger Attack

हॅकर्स अशा सॉफ्टवेअरचा वापर करतात जे तुमच्या कीबोर्डवर टाईप केलेले प्रत्येक अक्षर रेकॉर्ड करते. त्यामुळे तुमचे पासवर्ड, OTP आणि वैयक्तिक माहिती मिळते.

Keylogger हल्ल्यापासून वाचायचं कसं?

  • Regular system scan करा.
  • अँटीव्हायरस सक्रिय ठेवा.

सायबर हल्ल्यांमध्ये सुद्धा आधुनिकता आली आहे. फक्त मोठ्या कंपन्यांवरच नव्हे तर सामान्य व्यक्ती, विद्यार्थी, आणि छोटे व्यवसाय सुद्धा त्यांचे लक्ष्य बनत आहेत. आपली सायबर जागरूकता (Cyber Awareness) हीच खरी सुरक्षा आहे.