Union Bank of India Recruitment बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 250 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. आपल्या कलागुणांना वाव देण्यासह देशातील एका महत्त्वाच्या बँकेत काम करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्र मंडळीपैकी कोणी बँकेमध्ये नोकरीच्या शोधात असेल तर, त्यांना ही बातमी तात्काळ पाठवा.
युनिय बँक ऑफ इंडियामध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत
पदाचे नाव – वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर)
पद संख्या – 250
पात्रता – MBA, एम पीजीडीबीए आणि 3 वर्षाचा अनुभव
वय – 25 ते 35 वर्ष असावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2025
या भरतीसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in ला भेट द्या.