Accident Video – एक चुकीचा टर्न आणि आयुष्य बरबाद, गाडीसह चालक भुईसपाट

उत्तराखंडमध्ये एक भयानक अपघात घडला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Accident Video)  झपाट्याने व्हायरल होत आहे. कार चालकाने अचानक टर्न घेतल्यामुळे भरधाव वेगात असलेला ट्रक चालकाला ट्रक कंट्रोल झाला नाही. या अपघातात कार चालकाच्या हाडांचा अक्षरश: चुरडा झाला आहे.

रस्त्यावर गाडी चालवताना पुढील पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

वेग नियंत्रणात ठेवा

क्षमतेपेक्षा जास्त वेग अपघाताचे मुख्य कारण असतो. परिस्थितीनुसार हळू व सुरक्षित वेगाने गाडी चालवा.

मोबाईलचा वापर टाळा

वाहन चालवताना कॉल, मेसेज किंवा व्हिडीओ पाहणे टाळा. लक्ष थोडे जरी विचलित झाले तर अपघात होऊ शकतो.

वाहतूक नियमांचे पालन करा

सिग्नल, लेन, झेब्रा क्रॉसिंग आणि ओव्हरटेकिंगचे नियम पाळा. नियम पाळल्यास अपघाताचा धोका कमी होतो.

सुरक्षा साधनांचा वापर करा

दुचाकीसाठी हेल्मेट व चारचाकीसाठी सीट बेल्ट नेहमी वापरा. 

गाडी चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा

थकवा, झोप येणे किंवा मद्यपान करून वाहन चालवू नका. स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

error: Content is protected !!