स्वराज्याचे तुरुंग म्हणून प्रसिद्ध असलेला सातारा जिल्ह्यातला ऐतिहासिक वासोट किल्ला (Vasota Fort) जगभरातील पर्यटकांसाठी उद्यापासून १५ ऑक्टोबर, पर्यटनासाठी पुन्हा खुला होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव किल्ला बंद ठेवला होता. मात्र, चार महिन्यांनी पुन्हा एकदा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
घनदाट अरण्य, सदाहरित वृक्षराजी आणि कोयनेचा अथांग जलाशय यामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून दुर्ग भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते. या पर्यटनाच्या पुनरुजीवनामुळे मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा आणि अंबवडे येथील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी वनविभागाकडून ‘जुना वासोटा’ यासह नवीन पर्यटन पॉईंट सुरू करण्याचे सर्वेक्षण सुरू आहे. व्याघ्र प्रकल्पातील शांतता अबाधित राखण्यासाठी हा संपूर्ण परिसर ‘सायलेन्स झोन’ घोषित करण्यात आला आहे.
वासोटा सफारीचे नियम, प्रवेश शुल्क आणि घ्यायची काळजी
-
प्रवेश शुल्क व इतर दर:
-
प्रौढ व्यक्ती: १५० रुपये
-
लहान मुले (५ ते १२ वर्षे): ७५ रुपये
-
गाईड शुल्क: ३०० रुपये
-
बोट पार्किंग शुल्क: २०० रुपये
-
डीएसएलआर कॅमेरा: १०० रुपये
-
-
महत्त्वाचे नियम व सुरक्षितता:
-
बोटीत बसल्यानंतर प्रत्येक पर्यटकाने लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक आहे.
-
एका बोटीत केवळ १२ ते १५ पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल.
-
प्रत्येक बोटीत अग्निशमन यंत्र ठेवणे बंधनकारक आहे.
-
सफारीदरम्यान मद्यपान व धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
-
-
गडावर गेल्यानंतर घ्यायची काळजी:
-
हा परिसर ‘सायलेन्स झोन’ असल्याने मोठ्याने घोषणा देणे, गोंगाट करणे किंवा स्पीकर वाजवणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
-
वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि जंगलाची शांतता अबाधित राखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे.
-
वासोटा किल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.