Video – No Pressure; मियांभाईचा हा झकास व्हिडीओ पाहिला का, BCCI ने केलाय शेअर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने आपल्या नावावर केला. अटीतटीच्या या लढतीत मोहम्मद सिराजची जादू चालली आणि त्याने इंग्लंडच्या स्वप्नांच्या चिंध्या उडवल्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज होती तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता होती. इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकही खिशात घालणार असचं सर्वांना वाटलं होतं. परंतु मोहम्मद सिराजने आपल्या भेदक माऱ्याने इंग्लंडची भंबेरी उडवली आणि सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. मोहम्मद सिराजने 5 विकेट घेत सामनाविराचा पुरस्कारही पटकावला. सामना झाल्यानंतर BCCI ने खास व्हिडीओ ट्वीटरवर (X) शेअर केला आहे.