पदवीधरांसाठी विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती 2023-24 / Vidyadhan Disability Scholarships For Graduates 2023-24

15,000 रुपये ते 60,000 रुपये आर्थिक सहाय्य, आर्थिकदृष्ट्या अपंग कुटुंबातील गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती (Scholarships For Students With Disabilities) जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक बाजू कमकूवत असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, हे या विद्याधन शिष्यवृत्तीचे (Vidyadhan Scholarship) महत्वाटे उद्दीष्ट आहे.

भारतातील नामांकीत ना-नफा संस्था सरोजिनी दामोदर फाउंडेशन (Sarojini Damodaran Foundation)द्वारे अपंगत्वाचा सामना करत असलेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी V Aable – विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती 2023-24 (Vidyadhan Disability Scholarships For Graduates 2023-24) हा शिष्यवृत्ती प्रोग्राम जाहीर केला आहे.

V Aable – पदवीधरांसाठी विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती 2023-24 (Vidyadhan Disability Scholarships For Graduates 2023-24)

पात्रता (vidyadhan Disability Scholarship)

• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
• अर्ज करणारा विद्यार्थी 40% अपंग असला पाहिजे
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 2022मध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी (HSC) परिक्षा 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी किंवा 6 CGPA प्राप्त केलेले असावे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

अपात्रता (Vidyadhan Disability Scholarship)

• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 12वी उत्तीर्ण केली नसेल तर अपात्र.
• अर्ज करणारा विद्यार्थी 40% पेक्षा कमी अपंग असेल तर अपात्र
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 2022मध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला नसेल तर अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता 12वी (HSC) परिक्षा 60% पेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण केलेली असेल तर अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत? (scholarships for students with disabilities)

• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
• बारावीची मार्कशीट
• सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र (टीप – शिधापत्रिका स्वीकराली जात नाही)
• अपंगत्व प्रमाणपत्र

फायदा काय होणार (Scholarships For Studetns With Disabilities)

ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना राज्य, अभ्यासक्रम, कालावधी इत्यादीनूसार 15 हजार रुपये ते 60 हजार रुपये पर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (vidyadhan Disability Scholarship)

31 जानेवारी 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (vidyadhan Disability Scholarship)

Vidyadhan Disability Scholarships For Graduates 2023-24

Leave a comment