Vidyadhan Scholarship Program – 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, वाचा सविस्तर…

Vidyadhan Scholarship Program 2025 हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील 11वी आणि 12वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. सरोजिनी दामोदरन फाउंडेशनचा हा एक अभिनव उपक्रम असून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

पात्रता काय आहे?

  • अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 2025 मध्ये राज्यातील मान्यताप्राप्त शाळा/संस्थेतून दहावी/SSLC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत 85 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा किंवा त्याचा CGPA 8.9 असावा
  • अर्ज करणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसाठी दहावी परीक्षेत 75 टक्के गुण आणि CGPA 7.9 असला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्न हे सर्व स्त्रोतांमधून 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत?

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा लेटेस्ट फोटो
  • दहावीच्या गुणपत्रिकेची स्कॅन केलेी प्रत
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत.
  • रेशन कार्ड स्वीकारले जाणार नाही.

(जर विद्यार्थ्याकडे मुळ मार्कशीट उपलब्ध नसेल तर अर्जदाराने SSLC/CBSE/ICSE वेबसाइटवरून इयत्ता 10वी ची तात्पुरती ऑनलाइन आवृत्ती अपलोड करू शकतात)

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Vidyadhan Scholarship Program 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2025