Lezim Dav – नाद लेझीमचा! आजोबांचा उत्साह आणि भन्नाट डान्स, पाहा हा झकास Video

Ganeshotsav 2025 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला सर्वजण लागले आहेत. डेकोरेशनची तयारी, मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये ढोल-पथकांचा सराव सुरू झाला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये पारंपरिक Lezim Davच्या  सरावाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने लेझीमवर मोठ्या प्रमाणात ठेका धरला जातो. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने लेझीम सरावात भाग घेतात. लेझीमसाठी सांगलीतील विसावा मंडळ सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. यांच्याच लेझीम पथकातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. Age is Just A Number या कॅप्शनसह तरुणांसोबत आजोंबानी लेझीम पथकात सहभाग घेतला आहे.