Wai Accident – रात्री रिक्षा ओढ्यात कोसळली पण दुसऱ्या दिवशी माहिती पडलं, एकसरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकसरचे 37 वर्षीय रिक्षाचालक विशाल मुगुटराव कळंबे यांच ओढ्यात रिक्षा कोसळल्याने अपघाती निधन झालं आहे. वाईवरून एकसरला जात असताना सोमवारी (23 जून 2025) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी (24 जून 2025) सकाळी लक्षात आली. जेव्हा काही नागरिकांनी रिक्षा ओढ्यात पडेलली पाहिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत ओढ्यातून रिक्षा आणि मृतदेह बाहेर काढला. या भीषण अपघातामुळे वाई तालुक्यातील पश्चिम भागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत विशाल मुगुटराव कळंबे यांच्या पश्चात त्यांची आई, मोठा भाऊ आणि विवाहीत बहिण असा परिवार आहे.

Mumbai Crime – दारूमुळे दोन मुलं अनाथ झाली; बेवड्या पतीने पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून केला


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!