Wai Nagar Parishad Election- एन थंडीत गरमागरम वातावरण! आज 34 केंद्रांवर मतदान, 65 उमेदवार रिंगणार

वाईमध्ये (Wai Nagar Parishad Election) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गरमागरम वातावरण वाईकरांना अनुभवायला मिळत आहे. याच गरमागरमीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडावी म्हणून 264 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांचीही गस्त वाढवण्यात आली असून 34 केंद्रांवर आज (2 डिसेंबर 2025) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडावी यासाठी आवश्यक सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

वाई पालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन प्रमुख पक्षांमध्ये तगडी लढाई रंगणार आहे. मागील आठ दिवसांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून वाईकरांच्या गाठीभेठी घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर नगराध्यक्षपदाच्या 4 आणि नगरसेवकपदासाठीच्या 61 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी न घाबरता मतदानाचा हक्क पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!