Wai Nagar Parishad Election – वाई नगरपरिषद निवडणूक, 72.98 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

वाई नगरपरिषद निवडणुकीसाठी (Wai Nagar Parishad Election) सोमवारी (2 डिसेंबर 2025) 34 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सध्या थंडीचा तडाखा सुरू असल्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अगदीच तुरळक स्वरुपाची होती. मात्र, दुपारच्या सत्रात वयोवृद्धांसह तरुणांनी सुद्धा मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपला हक्क बजावला. 31,763 पैकी 23,182 म्हणजेच 72.98 टक्के मतदान दिवसभरात झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मिटकरी यांनी दिली. मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडावी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

error: Content is protected !!