Wai News – कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा; ज्ञानदीप स्कुलच्या मुलांनी पटकावले उपविजेतेपद

कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा हातकणंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल पेठवडगावमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) पार पडली. या स्पर्धेत वाईच्या (Wai News) ज्ञानदीप स्कुल व ज्युनियर कॉलेजच्या मुलांना सातारा जिल्ह्याचे प्रितिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या संधीच मुलांनी सोनं केलं आणि स्पर्धेत विभागीय उविजेतेपद पटकावले.

विविध स्पर्धांमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेजची मुले उल्लेखनीय कामगिरी करत आहे. जिल्हा स्तरावर हँडबॉल, फुटबॉलसह विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीच्या जोरावर मुलांनी विजेतेपद पटाकवले आहेत. आता पुन्हा एकदा मुलांनी ज्ञानदीप स्कुलसह जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. हातकणंगले तालुक्यात पार पडलेल्या स्पर्धेत ज्ञानदीपच्या मुलांनी उपविजेतेपद पटकावले. सहभागी झालेल्या सर्व खेळाडू व शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन लेंभे यांचे अभिनंदन शाळेच्या प्राचार्या शुभांगी पवार, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप व सर्व विश्वस्तांनी केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्केटिंग रोलबॉल स्पर्धेत सहभागी झालेला मुलांचा संघ

यशराज अमृता मगर, आर्यन राहुल ननावरे, ओमकार प्रवीण कोरडे, आदित्य मधुकर शिंदे, अनुराग सागर चक्के, आयुष संजय भोसले, चैतन्य संदीप डेरे, क्षितिज पुरुषोत्तम तरडे, सोहम महादेव जाधव, दानिश रौफ पठाण, लाभ कुशल शहा, वेदांत रमेश दौंड

error: Content is protected !!