Wai News – पाऊस आला की अंधार! वाई तालुक्याच्या पश्चिम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; मंगळवारीही लाईट गायब

वाई (Wai News) तालुक्याच्या पश्चिम भागात थोडासा जरी पाऊस झाला तरी वीजपुरवठा खंडित होणे नित्याचे झाले असून नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी (22 मे 2026) दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा तात्काळ बंद पडला. आधीच दर मंगळवारी नियोजित वीजबंदी असताना, अशा अवकाळी पावसामुळे वारंवार अंधाराचे संकट निर्माण होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

या वादळी पावसाचा फटका शेतकरी वर्गालाही बसला आहे. आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून झाडांवरील आंबे गळून पडले आहेत, तर भुईमुगासह इतर पिकांची कामे विस्कळीत झाली आहेत. जोर, गोळेगाव यांसारख्या दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, विद्युत तारा खंडित होणे आणि रात्रीच्या वेळी पूर्ण अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!