Wai News – दीपावलीचे औचित्य साधत वयगांवमध्ये कन्या पूजन आणि दीपोत्सव कार्यक्रम, पाहा Video

ग्रामस्थ मंडळ वयगांव आणि ग्रामपंचायत वयगांवच्या संकल्पनेतून आणि गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या सौजन्याने लक्ष्मीचं रुप असणाऱ्या लहान मुलींचे पाद्यपूजन आणि दीपोत्सव कार्यक्रम श्री गुरदत्त मंदिरात पार पडला. सर्व कन्यांचे औक्षण ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ श्री गुरुदत्त मंदिरामध्ये उपस्थित होते. मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते कन्या पूजन पार पडल्यानंतर दीपोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून व्याहळी गावच्या PSI प्राची थोरवे, प्रशांत थोरवे वाई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरे यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ “कृष्णाथडीचा सवंगडी” या युट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आला आहे.