Wai News – वीज गेली की टॉवरही बंद! पश्चिम भागात मोबाईल नेटवर्कचा लंपडाव, सात गावांना बसतोय फटका

निसर्गसंपन्न वाई (Wai News) तालुका फिरण्यासाठी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगली वाढली आहे. प्रामुख्याने वाई शहर, धोम परिसर आणि पश्चिम भागातील डोंगराळ भागांमध्ये पर्यटक दर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, याच पश्चिमेकडील अतिदुर्गम पट्ट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल नेटवर्कचा लंपडाप सुरू आहे. खावलीपासून ते कोंढावळेपर्यंतच्या सात गावाना यांना चांगलाच दणका बसत आहे. नेटवर्क अभावी ग्रामस्थांचे या 5G च्या जगाच चांगलेच हाल होत आहेत.

दै.पुण्यनगरीने दिलेल्या वृत्तानुसार, खावली ते कोंढावळे या भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क मिळावा म्हणून पाच वर्षांपूर्वी वडवली येथे BSNL चा मोबाईल टॉवर उभारण्यात आला. नेटवर्कची सोय झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. परंतू हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. वडवलीमध्ये उभारण्यात आलेला BSNL टॉवर आसरे गावातील BSNL टॉवरवर अवलंबून आहे. त्यामुळे एक टॉवर बंद झाला की, आपोआप त्याचा फटका दुसऱ्या टॉवरलाही बसतोय. तसाच प्रकार सध्या सुरू असून मागील अनेक महिन्यांपासून हे दोन्ही टॉवर वारंवार बंद पडत असल्याने या भागातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

एकीकडे 5G सह आधुनिकतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे नेटवर्कअभावी या सर्व गोष्टींवर गावकऱ्यांना पाणी सोडावं लागत आहे. नेटवर्क अभावी अनेक महत्त्वपूर्ण कामे होत नाहीयेत. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आजच्या घडीला विविध क्लासेस, कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र, नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करताना असंख्य अडचणींना सामना करावा लागत आहे. 24 तासांत अनेक वेळा टॉवर बंद पडत असल्याने नागरिक हैराण आहेत. महिन्या महिन्याचा रिचार्ज मारूनही त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाहीय. नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि कंपन्यांकडून मात्र उघड उघड लुट सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. दोन्ही टॉवरची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, पुरेसा वीज-बॅकअप आणि आधुनिक नेटवर्क सुविधा प्रदान करावे, अशा मागण्या स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. 

error: Content is protected !!