Shahir Sable- शाहीर साबळे यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त विशेष मानवंदना, एकसरमध्ये रंगणार सोहळा

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे महाराष्ट्र भूषण, पद्मश्री शाहीर साबळे (Shahir Sable) यांना मानवंदना देण्यासाठी विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 सप्टेंबर 1923 रोजी त्यांचा पसरणीमध्ये जन्म झाला तर 20 मार्च 2015 रोजी मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त ‘संकल्प कला स्पर्श सोहळा 2025’ चे आयोजन करण्यात आळे आहे. 3 सप्टेंबर रोजी एकसरमध्ये या सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातील राजकीय नेते, दिग्गज कलाकार, शाहीर यांचा सहभाग असणार आहे. पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान आणि संकल्प न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार आहे. ‘सामना’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

कोण आहेत शाहीर साबळे?

शाहीर कृष्णाराव साबळे हे महाराष्ट्रातील लोककला, विशेषतः लोकगीते, तमाशा आणि भारूड यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे नामवंत लोककलावंत होते. 

  • त्यांना “शाहीर” ही उपाधी त्यांच्या लोकजागृतीपर कामामुळे मिळाली.
  • त्यांनी जय महाराष्ट्र माझा हे सुप्रसिद्ध गीत रचले व गायले, जे आजही मराठी मनात देशभक्ती जागवते.
  • महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळातील सांस्कृतिक चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • ते गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेतेही होते.
  • त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

थोडक्यात, कृष्णाराव साबळे हे महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे संवर्धन करणारे, जनमानसात उर्जा आणि अभिमान जागवणारे एक महान लोककलावंत होते.