Wai News सिद्धनाथवाडीत जुन्या भांडणाचा राग डोक्यातून ठेवून सहा जणांनी अक्षय कांताराम जाथव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. अक्षय हा सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाथव यांचा मुलगा आह. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार शनिवारी (12 जुलै 2025) रात्रीच्या सुमारास घडला आहे. सिद्धनाथवाडीतील मारूती मंदिराच्या शेजारी अक्षय जाधव, संदीप वाघ आणि समीर मुकणे हे तिघे बोलत उभे होते. यावेळी सहा जणांनी अक्षयला शिवीगाळ करत कोयता व दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. कोयत्याने डोक्यात वार केल्याने अक्षय गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरेबाझार झोपटपट्टी सिद्धनाथवाडीतील अजय मच्छिंद्र धोत्रे, विजय मच्छिंद्र धोत्रे, प्रेमजीत संतोष पवार, शुभम बाजीराव जाधव, मनोज अमर जाधव, विकास जाधव या संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. ‘पुढारी’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.