वाई (Wai News) तालुक्यातील ओझर्डे गावात मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी घर फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी गजाच्या सहाय्याने चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेशे केला परंतु त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. हाती काहीच लागलं नाही म्हणून चोरांनी शेजाऱ्याच्या घरासमोर असलेला पितळेला बंब लंपास केला. याप्रकरणी भुईंच पोलिसांनी अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर्डे गावातील मालदारवस्तीमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे यांच घर आहे. यांच्याच घरामध्ये रात्री दोन वाजता चोरांनी कुलूप तोडून घर फोडण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये त्यांना काहीही मिळालं नाही म्हणून त्यांनी शेजारी राहणाऱ्या आनंद बापू फरांदे यांच्या घरासमोर असलेला पितळेचा बंब चोरून नेला आहे. त्याचबरोबर जनार्दन महादेव फरांदे यांच्या गोठ्यातील गाय चोरून नेण्याचा प्रयत्न सु्द्धा केल्याचे दिसून आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.