Wai News – प्रचंड कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर वयगांवच्या पठ्ठ्याने मैदान मारलं, अजय वाडकरची मुंबई पोलीस दलात निवड

वाई (Wai News) तालुक्यातील वयगाव गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. अजय शशिकांत वाडकर याची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीला अखेर यश मिळाले आहे. गेली सातहून अधिक वर्षे त्यानी प्रचंड कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे स्वप्न जपलं आणि अखेर ते सत्यात उतरवलं. अनेक अडचणींवर मात करत अजयने मिळवलेलं हे यश गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अजयच्या या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. वडील शशिकांत वाडकर आणि आई कल्पना वाडकर यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि संस्कार यामुळेच अजयला हे यश गाठता आलं. त्यांच्या या यशामुळे वयगाव गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!