Wai News – BSF निवृत्त आजोबांची प्रेरणा; एकसरचा सुपुत्र यशाच्या शिखरावर! करन अनिल घाडगे मुंबई पोलीस दलात

वाई (Wai News) तालुक्यातील एकसर गावचा सुपुत्र करन अनिल घाडगे याने जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. करन केवळ 5वीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. या कठीण प्रसंगानंतर आईने खंबीरपणे जबाबदारी सांभाळली, तर BSF मधून निवृत्त असलेल्या आजोबांनी शिस्त, देशसेवेची प्रेरणा आणि वर्दी घालण्याचे स्वप्न त्याच्या मनात रुजवले. आजी-आजोबांच्या संगोपनात वाढत करनने शिक्षण पूर्ण केले आणि वाईमध्ये काम करत असतानाच क्रिकेटमध्येही ग्रामीण भागात स्वतःचे नाव निर्माण केले. NCC मधील सहभागामुळे त्याची देशसेवेची ओढ अधिकच वाढली.

पुढे करन मुंबईत गेला, जिथे तो काम करत-करत अभ्यास आणि सराव करत राहिला. प्रतिकूल परिस्थितीतही आईचा पाठिंबा, आजोबांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यामुळे त्याने आपले स्वप्न साकार केले. अखेर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर करनची मुंबई पोलीस दलात निवड झाली. त्याच्या या यशामुळे एकसर गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!