Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video

Wai Rain News मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बलकवडी आणि धोम धरण जवळपास 95 ते 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाई शहरातील महागणपती मंदिरात पाणी गेलं असून कृष्णा नदीने गणपतीच्या चरणांना स्पर्श केलं आहे. तसेच अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. छोटा पूल सुद्धा पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरणातून 16 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Satara Rain Update – पाटणमध्ये NDRF च्या टीमने 11 माकडांना दिलं जीवदान; पाहा थरारक Video