वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26 : वयगांवची विजयी घोडदौड सुरूच, लोकसहभागाच्या जोरावर पटकावला तालुक्यात पहिला क्रमांक

पाणी व स्वच्छता विभागांतर्गत वाई चषक स्पर्धा 2024-25 या नाविण्यपूर्ण उपक्रमांत जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीत वयगांव गावाने लोकसहभागाच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (6 डिसेंबर 2025) देशभक्त किसनवीर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. ना. मकरंद पाटील (आबा) मंत्री, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. 

वयगांव गावाने गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत दमदार कामगिरी केली आहे. सरपंच, उपसरंपच, ग्रामसेविका यांच्यासह ग्रामस्थांचा या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग पाहायला मिळतो. वाई स्वच्छता चषक स्पर्धेच्या अनुषंगाने “आपले गाव-स्वच्छ गाव” या ब्रीद वाक्याला अनुसरून अनेक उपक्रम गावामध्ये राबविण्यात आले. लोकसहभागातून गावातील प्रत्येक भागाची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती मोहित, वृक्षारोपन, पर्यावरणपूरक उपक्रम अशा अनेक गोष्टी गावामध्ये राबविण्यात आल्या. ही सर्व कामे ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे शक्य झाली आणि गावाने समृद्ध होण्याच्या दिशने पुढचं पाऊल टाकलं. ग्रामस्थांतील एकी, ग्रामपंचायतीची योजनाबद्ध अंमलबजावणी आणि तरुणांचा सक्रिय सहभाग हेच वयगांवच्या यशामागचे मोठे घटक असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. या स्पर्धेमध्ये तालुक्यात दुसरा क्रमांक पसरणी आणि तिसरा क्रमांक आसरे या गावाने पटकावला आहे. 

Wai News – वीज गेली की टॉवरही बंद! पश्चिम भागात मोबाईल नेटवर्कचा लंपडाव, सात गावांना बसतोय फटका

इतर गटांतील विजेते खालीलप्रमाणे 

बावधन गट :

प्रथम – परखंदी

द्वितीय – बोपर्डी

तृतीय – दरेवाडी

Wai News – स्व. यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा! वयगांव ZP शाळेच्या रुद्र आणि सोहमची जिल्हास्तरासाठी निवड

ओझर्डे गट 

प्रथम – वेळे

द्वितीय – ओझर्डे

तृतीय – बोपेगाव

Sunny Fulmali Success Story – झोपडी ते सुवर्णपदक! वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात; मुलाने भारताची मान अभिमाने उंचावली

भुईंज गट 

प्रथम – खडकी

द्वितीय – चांदवडी

तृतीय – कळंभे

यावेळी समारंभाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. 

U23 Athletics Competition – जावळीच्या सुदेष्णाची ‘सुवर्ण’ झेप; पदकांची हॅट्रिक आणि दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड

Leave a comment

error: Content is protected !!