सध्याच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे.अन्न, औषधं, आरोग्य सेवा, प्रवास आणि जीवनावश्यक गोष्टींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. याच गोष्टी लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना (What is Ayushman Bharat Yojana ) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे.
सरकारने चालू केलेल्या “प्रधानमंत्री जन आरोग्य योजने”साठी आयुष्मान कार्ड बनवणे गरजेचे आहे. या कार्डमध्ये अनेक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजारावर उपचार करणे सोपे जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.
आयुष्मान कार्डमध्ये कोणत्या आजारांचा समावेश?
प्रसूती आणि स्त्रीरोग – सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टॉमी यांचा आयुष्मान कार्डमध्येसमावेश आहे.
श्वसन रोग – दमा व्यवस्थापन, सीओपीडी, टीबी, न्यूमोनिया आणि इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार यांचा समावेश आहे.
न्यूरोलॉजिकल रोग – स्ट्रोक आणि अर्धांगवायू, ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सी उपचार, स्पाइनल कॉर्ड रोग आणि पार्किन्सन यांचा समावेश आहे.
हृदयरोग – कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, उच्च रक्तदाबाशी संबंधित आजार, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग, स्तन, आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी या सरगळ्याचा कार्डमध्ये समावेश आहे.
ऑर्थोपेडिक्स – हिप आणि गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर आणि हाडांच्या दुखापती, ऑस्टियोपोरोसिस उपचार आणि संधिवात यांचा समावेश आहे.
आयुषमान कार्डची पात्रता कशी तपासाल
- https://pmjay.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Am I Eligible?” या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा मोबाइल नंबर, राज्य, आणि OTP भरून पात्रता तपासा
- किंवा आधार / राशन कार्ड नंबर वापरून पात्रता पडताळा करा
ऑनलाइन अर्ज कसा भराल
- https://mera.pmjay.gov.in/ या वेबसाइटवर जा
- “Apply for Ayushman Card” वर क्लिक करा
- आधार कार्ड वापरून OTP द्वारे लॉगिन करा
- तुमचा आणि कुटुंबाचा तपशील भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- फॉर्म सबमिट करा आणि नंतर कार्ड डाउनलोड करा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- फोटो (पासपोर्ट साईज)
- जर गरज लागलीच तर उत्पन्नाचा दाखला
या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही?
सरकारने सुरू केलेली ही योजना गरिब आणि गरजू लोकांसाठी असणार आहे. या आरोग्य विमा योजनेत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांचा समावेश असेल. मात्र करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, PF किंवा ESIC ची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.