सायबर सुरक्षा कोर्स / Cyber Security Course Information In Marathi

डिजिटल युगात ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाने वेग पकडला आहे. त्याच वेगाने जग सुद्धा पुढे चालले आहे. मोबाईल आणि संगणक सारखी उपकरणे हातळने आता तितकं कठीण राहीले नाही. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सर्वच मोबाईल आणि संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. ज्या वेगाने मोबाईल आणि संगणक सारख्या उपकरणांचा वापर वाढत आहे. त्याच वेगाने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होताना दिसत आहे. याच सुरक्षेच्या कारणास्तव सायबर सुरक्षा कोर्स/Cyber Security Course Information In Marathi चे महत्व वाढलेले आहे. या कोर्सकडे वळणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपली मराठी मूल सुद्धा या क्षेत्रामध्ये पुढे यावीत आणि चांगल कारिअर त्यांनी या क्षेत्रामध्ये घडवावं याच उद्देशाने ही माहिती तुमच्या पर्यंत आम्ही पोहचवत आहोत.

सायबर सुरक्षा म्हणजे काय ? what is cyber security

सायबर सुरक्षा किंवा सेक्युरीटी हे माहिती तंत्रज्ञान (IT) मधील एक विशेष क्षेत्र आहे. या क्षेत्राला संगणक विज्ञानातील एक उपप्रकार म्हणूण सुद्धा ओळखले जाते. सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाचं उद्दीष्ट विध्यार्थ्यांना सायबर हल्ल्यांपासून संगणक ऑपरेटिंग सिस्टम, नेटवर्क आणि डेटाचे रक्षण करण्यासाठी सूसज्ज करणे आहे. यासाठी लागणार आवश्यक ज्ञान आणि कौशल्य सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना दिले जाते.

सायबर सुरक्षेची गरज का आहे ? cyber security Course

भविष्याच्या दृष्टीने सायबर सिक्यूरिटी हा व्यवसाय म्हणूण विकसीत होताना दिसत आहे. सायबर सिक्यूरिटी हा व्यवसाय वाढण्यामागचं कारण जर पाहिल तर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजचं जग हे डिजिटल आहे आणि या डिजिटल युगात मोठ-मोठे उद्योग असो अथवा छोटे व्यावसायिक ऑनलाइन व्यवहार करण्याला पसंती देत आहेत. या ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून संवेदनशील डेटा चोरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अश्या गुन्हेगारांपासून आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा व्यवसायिकांची आवश्यकता वाढू लागली आहे. सायबरस्पेस हे एक सामान्य व्यासपीठ आहे ज्यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणीही प्रवेश करू शकत आणि त्यामुळेच सायबर सुरक्षततेची व्याप्ती जगभरात तितकिच पसरलेली आहे.

सायबर सुरक्षा कोर्समध्ये करिअर कोण-कोण घडवू शकत ?

सायबर सुरक्षामध्ये करिअर करण्यासाठी पदवी, डिप्लोमा किंवा पदवीपूर्व (Under Graduate) आणि पदव्युत्तर (Post Graduate) स्तरांवर ऑफर केलेल्या सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेऊन विद्यार्थी आपले करिअर घडवू सायबर सुरक्षा या क्षेत्रामध्ये घडवू शकतात.

1) 12वी नंतर सायबर सुरक्षा कोर्स / cyber security courses after 12th.

बारावी पूर्ण झाल्यावर सायबर सुरक्षेमध्ये आपल करियर घडवू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांमध्ये काही मौल्यवान कौशल्य असणे आवश्यक आहे. जसे की तांत्रिक कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, कम्प्युटर नेटवर्किंग, प्रोग्रामिंग, ऑपरेटिंग सिस्टम, डेटाबेस, समस्या सोडवण्याचे कौशल्य, सेक्युरीटी स्किल्स, संस्थात्मक कौशल्य.
या सर्व कौशल्यांबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ !
तांत्रिक कौशल्य : सायबर सुरक्षेसाठी तांत्रिक कौशल्य महत्वाची भूमिका बजावतात. या स्किलमध्ये नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे ज्ञान समाविष्ट आहे.
कम्युनिकेशन स्किल : ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे विध्यार्थ्यांनी इतरांशी प्रभावीपणे सवांद साधण्याच स्किल विकसित केल पाहिजे. हे स्किल विकसित करण्यामध्ये तांत्रिक संकल्पना स्पष्ट करणे तसेच ग्राहकांशी संवाद साधने समाविष्ट आहे.
कम्प्युटर नेटवर्किंग : विध्यार्थ्यांना संगणक नेटवर्किंग आणि त्याचे प्रोटोकॉल, जसे की TCP/IP, इंटरनेट आणि वायफाय ची माहिती असणे आवश्यक आहे.
प्रोग्रामिंग : विध्यार्थ्यांना सी, Java किंवा Python सारख्या किमान एका प्रोग्रामिंग भाषेचे ज्ञान असल पाहिजे. तसेच ऑब्जेक्ट-ओरीयेंटेड प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदमची मूलभूत माहिती देखील असली पाहिजे.
ऑपरेटिंग सिस्टम : विध्यार्थ्यांना विंडोस, मॅकओएस आणि लिनक्स सारख्या प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम समजून घेता आल्या पाहिजेत.
डेटाबेस : विध्यार्थ्यांनी त्यांचे आर्कीटेक्चर, क्वेरी भाषा आणि एन्क्रिप्शन सारख्या सुरक्षा उपायांसह डेटाबेस समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे.
समस्या सोडवण्याचे कौशल्य : सायबर सुरक्षेमध्ये वेळेच्याआत प्रभावीपणे समस्या सोडवण्याच कौशल्य तुमच्यात असल पाहिजे. हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी विश्लेषणात्मक विचार आणि तांत्रिक समस्यांचे निवारण करण्याची उच्च क्षमता असली पाहिजे.
सेक्युरीटी स्किल्स : हा सर्वात महत्वाचा घटक आहे. विध्यार्थ्यांना फायरवॉल, घुसकोरी शोध प्रणाली आणि अॅंटीव्हायरस सॉफ्टवेअर सारख्या सुरक्षा साधनांशी परिचित असले पाहिजे.

2) 12 वी नंतर सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रकार / cyber security courses after 12th.

बारावी नंतर विविध प्रकारे सायबर सुरक्षा कोर्सच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. तुमची क्षमता आणि आवड कोणत्या प्रकारामध्ये आहे, त्यानुसार तुम्ही प्रकार निवडून सायबर सुरक्षा शिकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकू शकता.
१२ वी यशस्वी पूर्ण झाल्यावर पूढील सायबर सिक्यूरिटी कोर्सचे प्रकार आहेत.
सायबर सिक्यूरिटीमध्ये डिप्लोमा : हा डिप्लोमा करण्यासाठी तुमची १२ वी पूर्ण असली पाहिजे.
सायबर सेक्यूरिटीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलजी (B.Tech) : हा कोर्स करण्यासाठी विध्यार्थ्याने १२ वी उत्तीर्ण असण गरजेच तर आहेच. पण सर्वात महत्वाच म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह १२ वी उत्तीर्ण असली पाहिजे. या विषयांमुळे या कोर्सच्या महत्वात अजून वाढ होते. कारण हा कोर्स विध्यार्थ्यांना सायबर हल्ले रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी टेक्निकल ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज करतो. या कोर्समध्ये सिस्टम सुरक्षा, संगणक सुरक्षा, क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सुरक्षा, सायबर फॉरेन्सिक्स ई. यासारख्या अनेक महत्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या कॉर्सचा कालावधी चार वर्षाचा असून साधारणपणे पूर्णवेळ पद्धतीनेच हा कोर्स करावा लागतो.
सायबर सिक्यूरीटीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc) : १२ वी यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यावर या कोर्सची दार सुद्धा तुमच्यासाठी उघडी होतात. हा कोर्स विध्यार्थ्यांना संगणक नेटवर्कवर होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी उपयोगी ठरतो.
ऑनलाइन सायबर सुरक्षा कोर्स : जर तुम्हाला सायबर सुरक्षा कोर्स ऑनलाइन शिकायचा असेल तर तुमच्याकडे काही पात्रता निकष असणे आवश्यक आहे. १) तुमचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असल पाहिजे २) सर्वात महत्वाच १२वी पूर्ण असली पाहिजे ३) सायबर सुरक्षा शिकण्यासाठी तुमच्याकडे काही मूलभूत ज्ञान असलेल उत्तम ४) सायबर सुरक्षे संबधित कामाचा अनुभव असेल तर उत्तम (कंपल्सरी नाही)

3) काही कारणास्तव १२ वी पूर्ण झाल्यावर जर सायबर सुरक्षा कोर्स करण शक्य झाल नसेल तर पदवी पूर्ण केल्यावर तुम्ही सायबर सुरक्षा कोर्स करू शकता

पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन सायबर सिक्यूरिटी (Diploma In cyber Security): सायबर सुरक्षामध्ये पोस्ट ग्रॅजुएशन करण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधील बॅचलर डिग्री पूर्ण केली असली पाहिजे. या डिप्लोमा कोर्सच वैशिष्ट्य म्हणजे या कोर्स मध्ये सायबर सुरक्षेची सखोल माहिती दिली जाते. या डिप्लोमा कोर्स मध्ये डेटा सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स, एथीकल हॅकिंग, क्रिप्टोग्राफी सारख्या विषयांचा समावेश आहे. हा पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा कोर्स एक वर्षाचा आहे. हा कोर्स चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पूर्णवेळ मोडमध्ये आयोजित केला जातो.

सायबर सुरक्षा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जॉबच्या काय संधी आहेत ?

जॉबच्या विविध संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. पुढे दिलेली लिस्ट तुम्हाला फायदेशीर ठरेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक जॉब प्रोफाइल निवडू शकता. त्या जॉब प्रोफाईलची प्रॉपर माहिती काढा आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने अजून एक पाऊल टाका.

सायबर सुरक्षा मध्ये जॉब प्रोफाईल लिस्ट
1) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी
2) सेक्युरीटी ऑडिटर
3) सेक्युरीटी अॅडमीन
4) सेक्युरीटी सॉफ्टवेअर डेव्हलपर
5) इनसिडेंट रिस्पोंडर
6) सेक्युरीटी आर्कीटेक्ट
7) सेक्युरीटी कोड ऑडिटर
8) पेनिट्रेशन टेस्टेस
9) सुरक्षा व्यवस्थापक
10) क्रीप्टोग्राफर
11) सुरक्षा सल्लागार
12) फॉरॅन्सीक तज्ञ
13) सुरक्षा विश्लेषक
14) सेक्युरीटी इंजीनियर

सर्वच मुलांच्या डोक्यात एक प्रश्न असतोच, तो म्हणजे मला जर हे क्षेत्र करियर म्हणूण निवडायच असेल तर मला पगार किती मिळणार किंवा भविष्यात चांगला अनुभव प्राप्त केल्यावर जास्तीत जास्त किती पगार मला मिळू शकतो.
१) तुम्हाला फ्रेशर म्हणूण कमीत कमीत वार्षिक पगार ०.२ ते ४ लाखाच्या दरम्यान मिळू शकतो. सरासरी वार्षिक पगार ३ लाख असतो.
२) चांगला चार ते पाच वर्षांचा अनुभव घेतल्यावर तुम्हाला ५.५ लाख ते १७ लाखांच्या दरम्यान वार्षिक पगार मिळू शकतो.

कोणतही क्षेत्र निवडताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे जितका जास्त अनुभव तितका चांगला परतावा. त्यामुळे क्षेत्र निवडताना काळजीपूर्वक निवडा आणि आपली आवड कश्यामध्ये आहे हे तपासून पहा. गूगलवर सर्च करा, लोकांचे अनुभव एका थोडक्यात काय तर सर्व माहिती तपासून पहा आणि योग्य क्षेत्र निवडा आणि उज्वल भविष्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करा.

ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. तसेच शारीरिक शिक्षण, डिजिटल मार्केटींग, लोको पायलट आणि मर्चंट नेव्ही या कोर्सेसची संपूर्ण माहिती आवर्जून वाचा तेसच शेअर करा.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment