ग्रॅज्युएशन झाल आता पुढे काय ? Best courses after graduation

Courses After Graduation What to do after graduation

१० वी १२ वी आणि ग्रॅज्युएशन असे महत्वाचे तीन टप्पे पूर्ण केल्यावर प्रत्येकालाच ओढ लागते ती चांगल्या पगाराच्या नोकरीची. पण बऱ्याच वेळा एक मोठा प्रश्न काही मुलांसमोर निर्माण होतो. तो म्हणजे आपली आवड कशामध्ये आहे हेच बऱ्याच वेळा मुलांना माहीत नसत. आणि जर घरामध्ये किंवा ओळखीच्या लोकांपैकी कोणीही जर जास्त शिकलेले नसेल तर अशावेळी रस्ता भरकटण्याचे शक्यता जास्त असते. या प्रॉब्लेममुळे बऱ्याच मुलांचे काही वर्ष किंवा त्याहूनही जास्त वर्ष आणि वेळ वाया जातो. पण काळजी करू नका तुमच जर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल असेल आणि पुढे काय कराव हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. पुढे काही कोर्ससेसची माहिती देण्यात आली आहे. बी.कॉम, बी.ए, बी.एससी म्हणजेच प्लेन ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या सर्वच विध्यार्थ्यांसाठी हे कोर्स फायदेशीर असणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडी नुसार तुमच्या एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकता.
Top Courses after graduation for high salary

१ ) डिजिटल मार्केटिंग / Digital Marketing Marathi (Courses After Graduation)

आजच जग जर पाहिल तर लहान मूल सुद्धा फोन किंवा लॅपटॉप सहज वापरताना पहायला मिळतात. माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा पण मोबाईलची सुद्धा यामध्ये नक्कीच भर पडली आहे. जग आधुनिक झाल आहे आणि येणाऱ्या काळात याच आधुनिकतेवर जगाची पावल चालणार आहेत. आज प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर काही वेळात आपल्या घरापर्यंत पोहचते. तसेच तिकीट बूकिंग, रिचार्ज आणि बिल पेमेंट सुद्धा इंटरनेटमुळे आपण घर बसल्या मोबाईले किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून करू शकतो. बरेच व्यवसायीक सुद्धा आपली उत्पादने ऑनलाइन विकून चांगला परतावा मिळवत आहेत. हीच तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे कारण डिजिटल मार्केटिंग कोणत्याही कंपनी असो अथवा व्यावसायासाठी खूप महत्वाची आहे. सोप्या भाषेत डिजिटल Digital Marketing म्हणजे काय तर आपल्या उत्पादनाची जाहिरात आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकासारख्या डिजिटल उपकरणांद्वारे जागतिक स्तरावर करणे. सध्या ४ जी आणि ५ जी च्या जमान्यात डिजिटल मार्केटिंगची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार / Types Of Digital Marketing in Marathi

१) SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन / Search Engine Optimization
२) SMM म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग / Social Media Marketing
३) PPC म्हणजे Pay-Per-Click
४) ईमेल मार्केटिंग
५) युट्यूब मार्केटिंग
६) अॅफीलीएट मार्केटिंग / Affiliate Marketing
७) कंटेंट मार्केटिंग / Content Marketing
८) अॅप्स मार्केटिंग / Apps Marketing

डिजिटल मार्केटिंग कोर्स कसा करायचा ? Digital Marketing Marathi

डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या शहरातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोर्स करू शकता. तर ऑनलाइन माध्यमातून तुम्ही गूगलचा मोफत प्रमाणित कोर्स करू शकता या साठी अ) Google Digital Unlocked ब) Google Skill Shop या दोन वेबसाइट वरुण तुम्हाला कोर्स करता येईल. तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोर्स करू शकता कोर्सचा कालावधी ३ महीने ते १ वर्षांचा सुद्धा असू शकतो तुमच्यावर अवलंबून आहे.
कोर्स पूर्ण झाल्यावर फ्रेशर म्हणून तुम्हाला सुरुवातीला वर्षाला सरासरी ३.४ लाख इतका पगार मिळू शकतो म्हणजे प्रती महिना २५ हजारच्या आसपास. Digital marketing scholarships

२ ) एमबीए MBA / MBA After Graduation (Courses After Graduation)

MBA हा सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. MBA म्हणजेच मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन हा एक पदव्युत्तर स्तराचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही व्यावसायाचे प्रशासन आणि व्यवस्थापन कसे करावे हे तुम्हाला शिकता येईल.

MBA After Graduation पात्रता

एमबीए कोर्ससाठी पदवी शिक्षणामध्ये तुम्हाला ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असले पाहिजेत आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४५ टक्के गुण आवश्यक आहेत.

करियरच्या संधी काय आहेत ?

तुम्ही तुमच्या आवडी नुसार एमबीए स्पेशलायझेशन क्षेत्र निवडू शकता जस की फाइनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंट ई.

कोर्सचा कालावधी आणि निवड कशी होणार ?

या कोर्सचा कालावधी १ वर्ष किंवा २ वर्ष असू शकतो तुमच्यावर अवलंबून आहे. एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पात्रता परीक्षा द्यावी लागते. या पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावली जाते. बऱ्याच कॉलेज मध्ये कॉलेजच्या माध्यमातूनच विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट दिली जाते. त्यामुळे जॉबच एक टेंशन कमी होऊन जात.

३ ) मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन MCA / MCA course details (Courses After Graduation)

ज्या विध्यार्थ्यांना संगणकाच्या विश्वात रमायला आवडत अश्या विध्यार्थ्यांसाठी हा कोर्स करीयरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन हा दोन वर्षांचा पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात तुम्ही संगणक अॅप्लिकेशन्सच्या शाखेतील स्पेशलायझेशनचा सखोल अभ्यास करू शकणार आहात. तांत्रिक समस्यांसाठी विशेष उपायांची आवश्यकता असते आणि एमसीए कोर्स हा ऑपरेटिंग सिस्टम, संगणक भाषा आणि सिस्टम प्रशासन यासारख्या डोमेन्स मध्ये उद्भवणार्या कठीण समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्ये प्रदान करतो. उत्तम आणि जलद अॅप्लिकेशन विकसीत करण्याच्या साधनांसह काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

MCA कोर्स कोण करू शकत ? MCA course details

संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यासारख्या प्रोग्रामींग भाषांचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा बाळगणारे एमसीए कोर्स करू शकतात.

MCA कोर्स पूर्ण झाल्यावर करियर संधी काय आहेत ? MCA course details

एमसीएचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर तुम्ही डेटा अॅनलिटिक्समध्ये शैक्षणिक किंवा संशोधनात देखील प्रवेश करू शकतात. तसेच एथीकल हॅकर्स, विविध आयटी कंपन्यांसाठी अॅप डेव्हलपर, मॅन्यूअल टेस्टर्स ई. म्हणूण तुमच करियर तुम्ही घडवू शकता.

MCA कोर्ससाठी कोण पात्र ठरू शकत ? MCA course details

MCA कोर्स करण्यासाठी तुम्ही बीसीए / बीएससी / बीकॉम / बीए यापैकी कोणतीही पदवी घेतलेली असावी पण ही पदवी घेताना कंपल्सरी तुमचा एक विषय गणित असला पाहिजे. तरच तुम्ही या कोर्ससाठी पात्र ठरू शकता.

४ ) Hotel Management / Hotel Management Information in Marathi.(Courses After Graduation)

हॉटेल मॅनजमेंट म्हंटल की बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो आचारी आणि एक न्यूनगंड मनात तयार होतो. पण हॉटेल मॅनेजमेंट करणे म्हणजे फक्त आचारी होणे अस काहीही नाही. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे संपूर्ण हॉटेलला मॅनेज करणे तसेच मोठमोठ्या ५ स्टार हॉटेल्स मध्ये मोठा शेफ बनण्याची संधी मिळू शकते.

हॉटेल मॅनेजमेंट कोण करू शकत ? Hotel Management Information in Marathi
.
हॉटेल मॅनेजमेंट कोणत्याही शाखेचे विध्यार्थी करू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. जस की डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स आणि सर्टिफिकेट कोर्स. डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स १० वी १२ वी नंतर करता येवू शकतो त्यासाठी विध्यार्थ्याला १० वी आणि १२ वी मध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे गजेच आहे. हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेण्यासाठी काही कॉलेज मध्ये प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाते. तसेच फक्त १० वी पास झालेले विध्यार्थी सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात.

१ वर्ष कालावधीत पूर्ण करता येणारे डिप्लोमा कोर्स ज्यांनी १० वी आणि १२ वी पूर्ण झालेली आहे अश्या विध्यार्थ्यांसाठी.

• Diploma In Hospitality And Tourism Study
• Diploma In Food And Beverage Service
• Diploma In Front Office Management
• Diploma In Hospitality Studies And Catering
• Diploma In Accommodation Management
• Diploma In culinary Arts And Bakery

6 महिन्यांमध्ये पूर्ण करता येणारे सर्टिफिकेट कोर्स ज्यांनी फक्त १० वी उत्तीर्ण केलेली आहे अश्या विध्यार्थ्यांसाठी

• Certificate Course In food And Beverage Service
• Certificate Course In Hospitality Management
• Certificate Course In Front Office Management
• Certificate Course In Accommodation Management

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स नंतर नोकरीच्या काय संधी आहेत ? Hotel Management Information in Marathi.

A. हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स
B. Indian Army And Navy
C. Catering Services
D. Cruise Liners
E. Restaurants, Clubs And Bars
F. Airline Kitchen

तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोर्स करून आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करू शकता.

https://marathichowkvishesh.com/how-to-become-a-loco-pilot-information-in-marathi-eligibility-rrb-alp-exam/

५ ) एलएलबी LLB After Graduation (Courses After Graduation)

LLB Course Information in Marathi

ज्या विध्यार्थ्यांना वकिली क्षेत्रामध्ये करियर करायच आहे. अश्या विध्यार्थ्यांसाठी एलएलबी हा एक उत्तम पर्याय आहे. पदवी पूर्ण झाल्यावर ३ वर्षांच्या वकिली अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन तुम्ही वकील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू करू शकता.

LLB After Graduation एलएलबी कोण करू शकत ?

सर्वात महत्वाच म्हणजे एलएलबी करण्यासाठी मान्यताप्राप्त महाविध्यालयातून किमान ४५ टक्के गुण तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही एलएलबी करण्यासाठी पात्र आहात. विशेष म्हणजे भारतात एलएलबी करण्यासाठी वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही जर ४५ टक्के गुण मिळवून पदवी पूर्ण केली असेल तर वयाच्या कोणत्याही वर्षी एलएलबी करू शकता.

LLB After Graduation LLB साठी प्रवेश कसा घ्याल ?

LLB ला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारे द्वारे घेण्यात येणारी MHT-CET Exam द्यावी लागते. या परीक्षेला लॉ CET सुद्धा म्हंटल जात. एकूण १५० मार्क्सची ही परीक्षा असून परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. हा पेपर पूर्ण करण्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जातो. या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेल्या मार्क्सच्या आधारे मेरिट लावल जात व मेरिट नुसार लॉ कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो.

LLB After Graduation एलएलबी झाली आता पुढे काय ?

एलएलबी नंतर अनेक क्षेत्रात तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जस की वकील म्हणूण नोकरी करू शकता, खाजगी किंवा सरकारी संस्था, विविध बँका, नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार बनण्याची संधी सुद्धा आहे. तसेच पुढील विभागांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
• बिझनेस हाऊसेस
• न्यूज चॅनेल
• सेल्स टॅक्स अँड एक्साइज डिपार्टमेंट
• शैक्षणिक संस्था
• लिगल कॉन्स्टांइस
• वर्तमानपत्रे

वरील विभागांमध्ये मेहनतीच्या जोरावर चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते. ही माहिती आपल्या पदवी पूर्ण केलेल्या मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण अश्या सर्वांपर्यंत नक्की पाठवा.
तुम्हाला काही चूक जाणवल्यास कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

https://marathichowkvishesh.com/what-is-ethical-hacking-types-eligibility-ethical-hacking-online-ethical-hacking-course/

4 thoughts on “ग्रॅज्युएशन झाल आता पुढे काय ? Best courses after graduation”

Leave a comment