गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा शिरकाव झाला आहे. परंतु याच आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व सामान्यांसह मोठमोठ्या अधिकार्यांना लाखो आणि करोडोंचा गंडा घातला जात आहे. पोलीस अधिकारीच या जाळ्यात फसत असल्यामुळे सर्व सामान्यांची चिंता आणखी वाढली आहे. सातारा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला एका महिलेने खोट सांगून डिजिटल अरेस्ट (What is Digital Arrest) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 5 लाख 35 हजार 599 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकारी जाळ्यात अडकला कसा? What is Digital Arrest
दै.पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, 2 ऑगस्ट रोजी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून हिंदीतून बोलत आहे, असल्याचं भामट्यांनी अधिकार्याला भासवलं. तसेच आधार कार्ड हरवले आहे का? अशी विचारणा केली. तक्रारदाराने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर. त्यावर तुमच्या खात्यावर करोडो रुपयांचा चुकीचा व्यवहार झाल्याच भामट्यांनी अधिकाऱ्याला सांगितलं. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी तुम्हाला फोन करतील, असं सांगून त्या महिलेने फोन ठेवला. हा झाला पहिला प्रसंग.
महिलेने फोन ठेवल्यानंतर दुसऱ्या अनोळखी नंबरवरून पोलीस गणवेश घातलेल्या व्यक्तीने त्यांना फोन केला. ‘तुमच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता व खात्यावर रक्कम आली आहे. यामुळे तुमची गोपनीय चौकशी करावी लागेल. तुम्हाला याबाबतची माहिती कोणालाही देता येणार नाही. अटक टाळायची असेल तर 5 लाख रुपये पाठवावे लागतील. चौकशी पूर्ण झाल्यावर कोर्टातून तुम्हाला तुमची रक्क पुन्हा खात्यावर पाठवली जाईल.’ असे सांगून पोलीस अधिकाऱ्याचा विश्वास संपादित केला. घाबरलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पैशांची जमवाजमव केली आणि 5 लाख 35 हजार 599 रुपये त्यांना पाठवले. ते पैसे अद्याप त्यांना परत मिळालेले नाहीत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे फोनवर किंवा सोशल मीडियावर येणारे फसवे कॉल/मेसेजेस, ज्यात स्वतःला पोलीस, न्यायालय, CBI, सायबर सेल किंवा सरकारी अधिकारी म्हणून सांगून भीती दाखवून पैसे उकळले जातात. यापासून वाचण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
Cyber Security Course Information In Marathi – सायबर सुरक्षा कोर्स
डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी उपाय
- अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका – कोणी स्वतःला पोलीस, CBI, RBI, कोर्ट अधिकारी म्हणत असेल तर लगेच घाबरू नका.
- व्हिडिओ कॉलवर “अरेस्ट दाखवणे” खोटं असतं – मोबाईल किंवा लॅपटॉपवरून कोणीही तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही.
- पैसे ट्रान्सफर करू नका – खात्यात पैसे भरण्यास सांगितले तर लगेच नकार द्या.
- लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नका – अशा लिंक/अॅपमुळे तुमचा डेटा चोरी होतो.
- खरी खात्री करून घ्या – कॉल करणाऱ्याचा नंबर गुगलवर/Truecaller वर तपासा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा.
- सायबर क्राईम हेल्पलाइन वापरा – 1930 (भारत सरकारचा नंबर) किंवा cybercrime.gov.in वर तक्रार द्या.
- ओटीपी, आधार, बँक डिटेल्स शेअर करू नका – सरकारी संस्था कधीही फोनवर अशी माहिती विचारत नाही.
- कुटुंबाला जागरूक ठेवा – वृद्ध लोक आणि विद्यार्थी हे टार्गेट होतात. त्यांना याची माहिती द्या.
थोडी काळजी घ्या आणि जागरूक राहा आणि डिजिटलस अरेस्ट पासून स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.