What Is Nagar Panchayat – नगरपंचायत म्हणजे काय? सातारा जिल्ह्यात किती नगरपंचायती आहेत?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले की नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका या नावांची जोरदार चर्चा होते. परंतु आजही अनेकांना या नावांमागचा नेमका अर्थ उमगत नाही. नगरपंचायत आणि नगरपरिषद या नावांमध्ये अनेकांची त्रेधातिरपीट होते. शाळेत असताना या सर्व गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या होत्या. परंतु कालांतराने याचा आपल्याला विसर पडत गेला. त्यामुळे आजही बऱ्याच जणांचा या नावांमध्ये गोंधळ उडताना दिसून येतो. या लेखामध्ये आपण नगरपंचायत (What Is Nagar Panchayat) म्हणजे काय? हे थोडक्यात आणि समजेल अशा शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. .

१) नगरपंचायत म्हणजे काय? What Is Nagar Panchayat

नगरपंचायत ही अशी स्थानिक शहरी संस्था असते जी सामान्यतः त्या भागासाठी असते जिथे लोकसंख्या आणि विकासाची गती ही अविकसीत गावापासून विकसीत शहराच्या दिशेने वाढण्याच्या टप्प्यात असते. लोकसंख्येच्या आधारावर यांचं वर्गीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नगरपंचायतींमध्ये लोकसंख्या ही 10,000 ते 25,000 च्या दरम्यान असते. परंतू हीच लोकसंख्ये देशातील त्या त्या राज्यांच्या नियमंनुसार बदलू शकते. 

मुख्य कामे – प्राथमिक रस्ते व प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी व ड्रेनेज, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य व शिक्षण सुविधा, चुकीच्या संरचना रोखणे, महसूल वसूल करणे व इतर स्थानिक सुविधा.

आर्थिक आधार – नगरपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असते. जसे की, स्थानिक कर, शुल्क आणि राज्य/केंद्र शासनातून मिळणारे अनुदान यावर अधिक अवलंबून असतात.

२) महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत? How Many Nagar Panchayat in Maharashtra

महाराष्ट्र राज्याच्या State Election Commission (SEC) च्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात एकूण १४७ नगरपंचायती आहेत

What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व

३) सातारा जिल्ह्यात किती नगरपंचायती आहेत? How Many Nagar Panchayat in Satara District 

सातारा जिल्ह्याच्या संदर्भातील अधिकृत यादीनुसार सातारा जिल्ह्यात एकूण 8 नगरपंचायती (Nagar Panchayats) खालीलप्रमाणे आहेत

  1. मलकापूर (Malkapur) .
  2. दहिवडी (Dahiwadi).
  3. पाटण (Patan) .
  4. मेढा (Medha)
  5. कोरेगाव (Koregaon) 
  6. खंडाळा (Khandala) 
  7. लोणंद (Lonand) 
  8. वडूज / वडूज (Vaduj / Waduj) 

4) का महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे?

योजनेचा लाभ: नगरपंचायतींना शहराच्या आराखड्याचे छोटे-मोटे निर्णय घेण्याची परवानगी असते, त्यामुळे स्थानिक गरजांची लवकर पूर्तता होते. 

विकासाच्या टप्प्यावर असणारी भूमिका: गावापासून शहरात रूपांतरानिमित्त आवश्यक पायाभूत सुविधा (पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन) वेळेत वाढवणे हा नगरपंचायतींचा मुख्य उद्देश असतो.

स्थानिक सहभाग: नागरिकांना थेट आपल्या शहराच्या विकासात भाग घेण्याची संधी मिळते, त्यामुळे शासन-योजना गावांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.