John Cena – 90 च दशक गाजवणारा WWE Champion, समाजकार्यातही पाडलीये विशेष छाप; वाचा सविस्तर…

John Cena म्हणजे 90 च्या दशकातील लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत. WWE पाहण्याच सर्वात मोठं कारण म्हणजे जॉन सीनाची मॅच. मीही त्याचाच एक चाहता. त्यामुळे त्याच्या जीवन प्रवास जाणून घेण्याची खूप उत्कंठा होती. व्यवसायिक रेसलर ते क्रीडा मनोरंजन आणि हॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता बनण्यापर्यंतचा जॉन सीनाचा प्रवास कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि तितकाच प्रेरणादायी आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत आवर्जून वाचा.

John Cena आणि प्रारंभिक जीवन | who is john Cena

जॉन फेलिक्स अँथनी सीना जूनियर याचा जन्म 23 एप्रिल 1977 रोजी वेस्ट न्यूबरी, मॅसॅच्युसेट्स, यूएसए येथे वडील जॉन सीना सीनियर आणि आई कॅरोल सीना यांच्या पोटी झाला. पाच भावांपैकी तो दुसरा होता. न्यू इंग्लंडच्या एका छोट्याशा गावात त्याचे बालपन गेले. शिस्तप्रीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. आई-वडिलांनी मोठ्या प्रेमाने त्याचा सांभाळ केला. लहानपणापासूनच, सीनाला खेळण्याची प्रचंड आवड होती. त्यातल्या फुटबॉल म्हणजे त्याचा जीव की प्राण. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने बऱ्यापैकी सर्वच फुटबॉल सामन्यांमध्ये भाग घेत आपली आवड जोपसली.

जॉनचे शिक्षण प्रथम लॉरेन्समधील सेंट्रल कॅथोलिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर कुशिंग अकादमी या खाजगी प्रिपरेटरी स्कूलमध्ये त्याला टाकण्यात आले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीनाने मॅसॅच्युसेट्समधील स्प्रिंगफील्ड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1999 मध्ये व्यायाम शरीरविज्ञानाची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात असताना जॉन सीना एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होता. तसेच त्याने अनेक स्पर्धांमध्ये त्याने महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व सुद्धा केल. विशेष म्हणजे तेव्हा त्याने त्याने 54 नंबर असणारी जर्सी परिधान करायचा. पुढे हाच 54 नंबर जॉन सीनाच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

असा झाला कुस्तीचा श्री गणेशा

कॉलेज संपल्यानंतर व्यावसायिक बॉडीबिल्डर बनण्याची महत्वाकांक्षा त्याने उराशी बाळगली होती. त्यामुळे त्याने कॉलेज संपल्या संपल्या थेट कॅलिफोर्नियाला गाठले. व्यावसायिक बॉडीबिल्डर होणे हे जॉनचे एकमेव स्वप्न होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दिवस-रात्र मेहनत घेतली. पडेल ते काम केले. कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. साल 2000 मध्ये खऱ्या अर्थाने त्याने व्यावयासिक कुस्तीमध्ये पाऊल टाकले. त्याने अल्टिमेट प्रो रेसलिंग (UPW) मध्ये नावनोंदणी करून आपल्या व्यावसायिक कारकि‍र्दीला सुरुवात केली.

सीनाच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे आणि शरीरयष्टीमुळे टॅलेंट स्काउट्सचे लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी ठरला. त्याने आपला सराव असाच सुरू ठेवला आणि 2000 साली पहिल्यांदा UPW हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून जॉन सीनाच्या यशाचा आलेख सतत उंचावत गेला. त्यानंतर त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही.

WWE मध्ये पदार्पण

जॉन सीनाने UPW मध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्याच पुढच्या वर्षी त्याच्यासाठी World Wrestling Entertainment अर्थात WWE चे दार खुले झाले. 2001 साली त्याने WWE सोबत करार करत अधिकृतरित्या WWE मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने सर्वप्रथम ओहायो व्हॅली रेसलिंग (OVW) या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची झलक दाखवत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. विशेष म्हणजे WWE मधील प्रसिद्ध ब्रॉक लेसनर आणि रँडी ऑर्टन यांच्याशी त्याने दोन हात करत आपली दखल WWE व्यवस्थापनाला घ्यायला भाग पाडले.

27 जून 2022 ही जॉन सीनासाठी व्यावसायिक रेसलिंगच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची तारीख ठरली. कारण याच दिवशी त्याने कर्ट अँगला खुले आव्हान देत रेसलिंगच्या मुख्य रोस्टरमध्ये पदार्पण केले. हजारो चाहत्यांच्या समोर त्याचा सामना रंगला. दुर्दैवाने हा सामना त्याला गमवावा लागला. मात्र जॉन सीना या नावाची पहिली झलक चाहत्यांना पहायला मिळाली.

जॉन सीनाच्या पदरात सर्वात मोठं यश पहिल्यांदा 2005 साली पडलं. त्याने WrestleMania 21 मध्ये JBL या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जॉन ब्रॅडशॉ लेफिल्डशी भिडत झाली त्याने त्याचा पराभव करत पहिली वहिली WWE चॅम्पियनशीप आपल्या नावावर केली. ही चॅम्पियनशीप त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. WWE चा एक टॉप स्टार म्हणून जॉन सीनाची व्यावसायिक रेसलर म्हणून साऱ्या जगाला ओळख झाली. त्यानंतर त्याने अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या आणि रेसलमेनियाला अनेक वेळा शीर्षक दिले आणि कंपनीचा मुख्य चेहरा बनला.

जॉन सीना हा फक्त एक रेसलर नव्हे तर उत्कृष्ट रॅपर सुद्धा आहे. व्यावसायिक रेसलर असतानाच त्याच रॅपर म्हणून प्रवास सुरू झाला होता. ‘डॉक्टर ऑफ थुगानोमिक्स’ ही त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्तीरेखा ठरली. त्याने आपल्या जादूई आवाजाने सर्वांना प्रभावित करत आपली एक वेगळी छाप पाडली. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग अगदी झपाट्याने वाढला.

हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुरुवात

सीनाची कुस्ती कारकीर्द जसजशी भरभराटीला आली, तसतसे त्याने आपल्या करिअरच्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली. 2006 साली त्याने WWE स्टुडिओ निर्मित ‘द मरीन’ या चित्रपटात काम करत हॉलीवुडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु या चित्रपटामुळे ॲक्शन स्टार म्हणून सीनाची एक वेगळी छाप चाहत्यांवर पडली.

सीनाच्या हॉलीवूड कारकिर्दीला Trainwreck (2015) आणि Blockers (2018) सारख्या विनोदी भूमिकांमुळे गती मिळाली, जिथे त्याच्या विनोदाची अचुकता दाखवत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. त्याच्या कामगिरीने हे सिद्ध केले की तो विविध शैलींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. 2021 मध्ये त्याने द सुसाईड स्क्वॉड मध्ये पीसमेकर म्हणून काम केले, ही भूमिका खूप गाजली. अभिनयात यशस्वी होत असताना त्याने वेळ मिळेल तस WWE मध्ये सुद्धा हजेरी लावली. WWE बद्दल त्याची असणारी कृतज्ञता त्याने वेळोवेळी दाखवून दिली.

समाजकार्यतही आहे अग्रेसर

कुस्ती आणि अभिनयाच्या पलीकडे, सीना त्याच्या परोपकारासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. मेक-ए-विश फाऊंडेशनच्या माध्यमातून दिलेल्या सर्वाधिक शुभेच्छांचा विक्रम त्याच्या नावावर आहे, ज्याने जीवघेणा आजार असलेल्या 650 हून अधिक मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. तरुण चाहत्यांचे जीवन उजळ करण्याच्या त्याच्या समर्पणामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे. सीना कर्करोग संशोधन आणि गुंडगिरी विरोधी मोहिमांसह विविध धर्मादाय कारणांसाठी वकील देखील आहे. त्याच्या “नेव्हर गिव्ह अप” मंत्राने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.

वैयक्तिक आयुष्य | john cena wife

सीनाचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत राहिले आहे. यापूर्वी त्याचे लग्न एलिझाबेथ ह्युबरड्यूशी झाले होते, परंतु 2012 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. 2020 मध्ये सीनाने कॅनेडियन अभियंता शे शरियाजादेहशी लग्न केले. 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment