Apta leaves – दसऱ्याला ‘सोनं’ म्हणून आपट्याचीच पानं का लुटतात? हिंदू धर्मातली पौराणिक कथा वाचलीच पाहिजे

विजयादशमी दसरा महाराष्ट्रासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त सोनं म्हणून आपट्याच्या पानांची (Apta leaves) लयलूट केली जाते. एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या जातात, तसेच आपट्याच पान दिल्यानंतर त्याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात एकमेकांना आलिंगन देत ‘राम-राम’ म्हणत सोनं लुटलं जातं. पण आपट्याचीच पानं का दिली जातात? काय आहे या मागची पौराणिक कथा? चला अगदी मोजक्या शब्दांत आणि थोडक्याच जाणून घेऊया.

गुरूदक्षिणा देण्यासाठी शिष्याचा हट्ट

पैठण शहरातल्या देवदत्त यांचा मुलगा कौत्स हा वरतंतु नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यासाचे धडे गिरवत होता. कौत्स तसा हुशार होता. त्याने ऋषींकडे राहून विद्या शिकली, शास्त्रांमध्ये पारंगत झाला. त्यामुळे त्याला आपल्या गुरुप्रती प्रचंड आदर होता. जेव्हा आश्रम सोडण्याची वेळ आली, तेव्हा तो गुरूदक्षिणा देण्यासाठी हट्ट धरू लागला. अखेर वैतागून वरतंतु ऋषींनी आपल्या शिष्याला 14 विद्या शिकल्यामुळे तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा एकाच व्यक्तीकडून आणण्याची अट ठेवली होती. कौत्सने अट स्वीकारली.

रघुराजा आणि कौत्स

एकाच माणसाकडून 14 कोटी रुपयांचं सोनं घेण्यासाठी कौत्स श्रीमंतांच्या शोधात निघाला. याच दरम्यान त्याची भेट दानशूर अशा रघुराजाशी झाली. तत्पूर्वी कौत्स आपला हट्ट अर्ध्यात सोडून देईल, अशी त्याचे गुरू वरतंतुंना अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. गुरुची अट मान्य केली आणि कौत्स चौदा कोटी सुवर्णमुद्रा जमवण्यासाठी घरबाहेर पडला. कौत्स रघुराजाकडे गेला.

पृथ्वी जिंकल्यानंतर विश्वजीत यज्ञ करून रघुराजाने सर्व संपत्ती दान केल्याचं कौत्सला सांगितलं. रघुराजा फक्त एका झोपडीत राहात होता. त्यामुळे कौत्सचा भ्रमनिरास झाला आणि तो तेथून निघाला. परंतु कौत्सची कथा एकल्यामुळे त्याने कौत्सला मदत करण्याचे अश्वासन दिले आणि त्याला आपल्या यज्ञ शाळेत थांबण्यास सांगितले.

अपट्याची पाणे देण्याच्या प्रथेचा उगम झाला…

सर्व संपत्ती दान केल्यामुळे रघुराजाकडे कौत्सला देण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे रघुराजाने आपली इंद्राकडे असलेली थकबाकी मागितली. परंतु त्याला इंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने इंद्रासोबत लढण्याची तयारी केली. यावेळी इंद्र रघुराजाला घाबरला आणि त्याने कुबेराला सांगून अयोध्या नगरीबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. यानंतर रघुराजाने कौत्सला सुवर्णमुद्रा घेण्यास सांगितले. त्यातील त्याने 14 कोटीच सुवर्णमुद्रा घेतल्या यानंतर त्या सुवर्णमुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या. त्या लोकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. या वेळेपासून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा रूढ झाली, असं म्हटलं जातं.