Why i Can’t Sleep – झोपायची इच्छा झालीये पण झोप येत नाही! असं कशामुळे होतं? डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे का?

आपल्याला झोपायची प्रचंड इच्छा होते, परंतु काही केल्या झोप (why i can’t sleep) येत नाही. तुम्हालाही असा अनुभव आला असेलच. परंतु आपण या सर्व गोष्टींचा फारसा विचार करत नाही. नॉर्मल आहे असं समजून वेळ मारून नेतो. परंतु तुमच्यासोबत सतत असं घडत असेल तर काही गोष्टींचा विचार करण गरेजचं आहे. झोप न येण्यामागे मानसिक, शारीरिक आणि वर्णनात्मक कारणं असू शकतात. तसेच काही सवयीमुंळे सुद्धा झोप येण्यास अडचणी येतात. चला आपण थोडक्यात आणि अगदी सोप्या शब्दांत याची माहिती जाणून घेऊया. 

झोप न येण्यामागची काही प्रमुख कारणं कोणती आहेत?

1. जास्त विचार / स्ट्रेस

  • डोक्यामध्ये सतत काही ना काही ना विचार सुरू आहे – ऑफिस, नातेसंबंध, पैसा, आरोग्य यांचा ताण.
  • “उद्या काय?” किंवा “माझं चुकलं का?” अशा विचारांमुळे मन शांत होत नाही.

2. मोबाइल / स्क्रीनचा वापर झोपेच्या आधी

मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप यांचा निळा प्रकाश (blue light) मेंदूला सांगतो की “अजून दिवस आहे”, त्यामुळे मेलाटोनिन नावाचं झोपेचं हार्मोन कमी होतं.

3. कैफिन, सिगरेट किंवा मद्यपान

  • झोपेच्या ५-६ तास आधी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, किंवा सिगरेट घेतल्यास झोप उशिरा येते.
  • मद्य (अल्कोहोल) झोप लवकर आणतो, पण तेव्हा गाढ झोप लागत नाही आणि मध्येच जाग येते.

4. खराब झोपेची सवय (Sleep Routine)

  • रोज झोपायची आणि उठायची वेळ वेगळी असते.
  • झोपायच्या वेळेपर्यंत झोपण्याचं ठिकाण (बेड) वापरलं जातं मोबाईल, जेवण किंवा कामासाठी.

5. आजार / Hormonal बदल

  • थायरॉईड, PCOS, डिप्रेशन, अँक्सायटी, पचन त्रास, किंवा इतर कोणतेही आजार.
  • महिलांमध्ये पाळीच्या वेळी किंवा मेनोपॉज जवळ आल्यावर झोपेच्या तक्रारी वाढू शकतात.

Why Do We Dream – तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात का? काय आहे यामगचं कारण? वाचा सविस्तर…

झोप लवकर आणि गाढ येण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत

1. झोपायच्या 1 तास आधी मोबाईल/टीव्ही बंद करा

त्याऐवजी पुस्तक वाचा, सौम्य संगीत ऐका, प्राणायाम करा.

 2. “माइंड शांत करणारी” सवय लावा

प्राणायाम (अनुलोम-विलोम, भ्रामरी), ध्यान किंवा थोडकं journaling.

3. स्लीप-फ्रेंडली आहार

  • झोपायच्या आधी गरम दूध किंवा हळदीचं दूध उपयुक्त ठरतं.
  • कैफिन/कॉफी/चहा टाळा.

4. रोज एकाच वेळेला झोपायला आणि उठा

शरीराचा नैसर्गिक घड्याळ सेट करण्यासाठी नियमीत वेळ महत्त्वाची आहे.

5. बेड फक्त झोपण्यासाठी वापरा

त्यावर मोबाईल, जेवण, किंवा ऑफिस काम करू नका.

6. दिवसभर थोडी व्यायामाची सवय

शरीर थकतं, झोप लवकर येते. पण रात्री अगदी झोपायच्या आधी व्यायाम करण टाळा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

  • झोप न येणं सतत 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू असेल.
  • दिवसभर थकवा, चिडचिड, लक्ष केंद्रित न होणे.
  • मध्येच जाग येणं आणि पुन्हा झोप न लागणं.

हवी तेवढी झोप न मिळणं केवळ थकवा देत नाही, तर एकूणच आरोग्यावर परिणाम करते – मानसिक संतुलन, हार्मोन्स, पचन, आणि स्मरणशक्तीवरही.