देशभरात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय ‘संविधान दिन’ (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आणि त्याबद्दलची माहिती भारतीयांना व्हावी या उद्देशाने देशभरातील शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या संविधानामुळे संविधानावर चालणारा भारत देश, अशी भारताची ओळख जगाच्या पटलावर निर्माण झाली, त्या संविधानाचा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. संविधान सभेमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आजाद, सरोजिनी नायडू या प्रमुख सदस्यांसह श्यामा प्रसाद मुखर्जी, आचार्य जे.बी.कृपलानी, एच.सी.मुखर्जी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन.गोपलस्वामी अयंगर, के.एम.मुंशी, मोहम्मद सादुला यांसह अशा 299 सदस्यांचा समावेश होता. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर भारताचे संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान देशभरात लागू करण्यात आले.
26 जानेवारी 1950 रोजी संविधान देशभरात लागू करण्यात आले, तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा दिवस सुद्धा देशभरा ‘संंविधान दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने 19 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.
Social Media Law – सोशल मीडियावर तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही? वाचा…
संविधानाने भारतीयांना दिलेले मुलभूत अधिकार
- समानतेचा हक्क (कलम 14 ते 18)
- स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22)
- शोषणाविरूद्ध हक्क (कलम 23 आणि 24)
- धर्म स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28)
- सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 आणि 30)