बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिण-भाऊ एकमेकांशी कितीही भांडले तरी रक्षाबंधनच्या दिवशी अगदी हक्काने बहिण भावाला राखी बांधतेच आणि भाऊ सुद्धा राखी बांधून घेतो. अवघ्या काही दिवसांवर बहिण भावाच्या नात्याला आकार देणारा हा सण आला आहे. देशभरात उत्साहात हा सण साजरा केला जाईल. परंतु एक बहिण मात्र या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी या जगात नाहीये. सासरच्या जाचामुळे अवघ्या सहा महिन्यात बहिण भाऊ एकमेकांपासून कायमचे दुरावले आहेत. भावूक चिठ्ठी लिहून 24 वर्षीये श्रीदिव्याने सासरच्या छळला कंटाळून जीवन संपवलं आहे.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये घटलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी श्रीदिव्याचे रामबाबू नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होते. मात्र लग्नानंतर त्याच्यातला राक्षस जागा झाला आणि त्याने पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीसह सासरची मंडळी श्रीदिव्याचा छळ करू लागली. या छळाला श्रीदिव्या कंटाळून गेली आणि तिने टोकाचा निर्णय घेत आपलं जीवन संपवलं. जीवन संपवण्यापूर्वी तिने भावासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तसेच माझ्या माझ्या मृत्युला पती आणि सासरचे लोक जबाबदार असल्याच सुद्धा तिने म्हटलं आहे. त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी तिने चिठ्ठीच्या माध्यमातून केली आहे.
“रामबाबू रोज दाऊ पिऊन घरी येऊन माझा शारीरिक छळ करत होता. मला शिवीगाळ करत होता. मला युजलेस म्हणालचा. कुठल्याही महिलेसमोर माझा अपमान करत होता. गालावर, डोक्यावर मारायचा आणि डोकं गादीवर दाबून पाठीत बुक्केही मारायचा. त्याच्या या मारहाणीमुळे माझं अंग रोज दुखायचं. मला हुंड्यासाठी वारंवर त्रास द्यायचा. या सर्व जाचाला कंटाळून मी जीवन संपवत आहे. तुला यावर्षी मी राखी बांधू शकणार नाही. तू तुझी काळजी घे.“ असं श्रीदिव्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिलं आहे.