Ajay Banga – पुण्यात जन्मलेले World Bank Group चे अध्यक्ष, कोण आहेत अजय बंगा? वाचा सविस्तर…

भारत म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तींचा खजीना. भारतात आढळणारी मानवरुपी मौल्यवान रत्न आज देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी निधन झालेले Ratan Tata हे त्याच मौल्यवान रत्नांपैकी एक. गुगलचे प्रमुख Sunder Pichai, इंग्लंडचे माजी पंतप्रधान Rishi Sunak, अमेरिकेच्या Kamala Devi Harris, आयर्लंडचे प्रमुख Leo Varadkar इ. हे सर्व भारतीय वंशाचे शिलेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल आहेत. या सर्व व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने त्यांच्यासह भारताचे नाव सुद्धा उंचावले आहे. या कर्तृत्वाने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये Ajay Banga वर्ल्ड बँकेचे प्रमुख, यांचे नाव सुद्धा आदराने घ्यावे लागेल. बऱ्याच जणांना अजय बंगा यांच्याबद्दल माहिती नाही. जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी ते जून 2023 पासून पार पाडत आहेत. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत आवर्जून वाचा.

2 जून 2023 रोजी अयपाल सिंह (अजय बंगा) यांच्यावर World Bank Group च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांचे नाव या पदासाठी नामांकित केले होते. अजय बंगा जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांच्यावर हवामान बदल, गरिबी कमी करण्यासाठी उपाय योजना करणे आणि जागतिक आर्थिक विकास यासारख्या समस्यांवर लक्ष्य केंद्रित करण्याची जबाबदारी आहे.

जन्म आणि शिक्षण Ajay Banga Education

अजय बंगा यांची कौटुंबिक पार्श्वभुमी भारतीय लष्कराशी संबंधित आहे. कारण अजय बंगा यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे भारतीय सैन्यात अधिकारी होते. त्यामुळे बालवयात त्यांच्यावर देशसेवेचे संस्कार झाले होते. अजयपाल सिंग बंगा यांच जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी महाराष्ट्रातील पुण्यात झाला. जन्म जरी पुण्यात झाला असला, तरी त्यांचे शिक्षण मात्र देशाच्या विविध भागांमध्ये झाले. कारण वडील भारतीय सैन्यात असल्यामुळे त्यांची वारंवार विविध शहरांमध्ये बदली होत होती. त्यामुळे भारतातली विविध शहरांमध्ये असणाऱ्या परंपरांची त्यांना माहिती होत गेली.

अजय बंगा यांचे शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी दिल्ली गाठली आणि दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. फक्त कला शाखेवर त्यांनी समाधान मानले नाही. त्यांनी आपले पुढील शिक्षण सुरू ठेवले आणि Indian Institute Of Management (IIM-A) अहमदाबादमधून MBA चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्या करिअरच्या कक्षा हळूहळू रुंदावत गेल्या.

नेस्ले ते जागतिक बँकेचे अध्यक्ष

अजय बंगा यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात Nestlé कंपनीतून केली. त्यांनी 13 वर्ष या कंपनीमध्ये विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. या जबाबदाऱ्यांमध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन पाहणे, मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आणि विक्री वाढवण्यासाठी उपाय योजना करणे या घटकांचा समावेश होता. 1981 ते 1994 हा 13 वर्षांचा कालखंड त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी कंपनी स्वीच केली आणि PepsiCo मध्ये जॉईन झाले.

1994 मध्ये नेस्ले कंपनीतून त्यांनी पेप्सिकोमध्ये आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला. ज्या पद्धतीने त्यांनी 13 वर्ष नेस्लेमध्ये जबाबदारी पार पाडली, त्याच पद्धतीने अजय बंगा यांनी पेप्सिकोमध्ये आपले काम सुरू ठेवले. या कालखंडामध्ये Pizza Hut, KFC सह अनेक कंपन्यांनी भारतामध्ये फ्रँचायझी सुरू करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये या सर्व फ्रँचायझी सुरू होण्यामागे अजय बंगा यांचा मोठा हात होता. अजय बंगा यांनी तीन वर्ष 1996 पर्यंत पेप्सिकोमध्ये सेवा बजावली त्यानंतर त्यांनी Citigroup हात हातात पकडला.

बँकिंग क्षेत्रातीन नामांकित कंपनी Citigroup मध्ये अजय बंगा 1996 साली जॉईन झाले. अजय बंगा यांच्या कारकि‍र्दीला सिटीग्रुपमध्ये चांगली कलाटणी मिळाली, त्याचा फायदा त्यांना भविष्यात झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बदलामुळे सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. त्यामुळेच त्यांनी 1996 ते 2009 या काळात सिटीग्रुपमध्ये असताता Asia-Pacific क्षेत्राच्या CEO सह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कंपनीचा देशभरात विस्तार केला. चीन, भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये कंपनीची पाळेमुळे त्यांनी रोवली. 1996 ते 2009 अशी 13 वर्षांची यशस्वी कारकिर्द त्यांनी सिटीग्रुपमध्ये पूर्ण केली आणि कंपनीला रामराम ठोकला.

Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

सिटीग्रुपमध्ये 13 वर्ष यशस्वी कारकिर्द पूर्ण केल्यानंतर 2010 मध्ये Mastercard च्या CEO ((Ajay Banga Mastercard CEO)) पदावर त्यांची वर्णी लागली. अजय बंगा यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हे त्यांचे सर्वोच्च पद होते. 1981 पासून सुरू झालेला हा प्रवास आणि या प्रवासातील त्यांचा सर्व अनुभव त्यांनी मास्टरकार्ड कंपनीमध्ये लावला. त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळाले. टेक्नॉलजीमध्ये देशभरात चांगली प्रगती झाली होती. सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत.

याच गोष्टीचा फायदा अजय बंगा यांनी घेतला आणि मास्टरकार्ड कंपनीमध्ये शक्य ते सर्व बदल करण्यास त्यांनी सुरुवात केली. याचे फळ म्हणजे मास्टरकार्डचा नावलौकिक वाढला आणि एक आघाडीची जागतिक पेमेंट आणि तंत्रज्ञानावर आधारित कंपनी नावारुपाला आली. ग्राहकांचा मास्टरकार्ड कंपनीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. क्रेडिट कार्डच्या पलीकडे अजय बंगा यांनी कंपनीचा विस्तार केला आणि जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात अवलंब सुरू झाला.

मास्टरकार्डमध्ये अजय बंगा यांनी आपल्या कामाचा चांगला दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना 2016 साली मिळाली. कारण 2016 मध्ये त्यांची मास्टरकार्डच्या कार्यकारी अध्यक्षपदी  वर्णी लागली. अजय बंगा यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे मास्टरकार्डच्या कॅपिटलायझेशनमध्ये चांगली वाढ झाली. तसेच डिजिटल वित्तीय सेवांमध्ये सुद्धा कंपनीने चांगली प्रगती केली. या सर्व गोष्टीचे श्रेय अजय बंगा यांना जाते.

अजय बंगा यांची मास्टरकार्डमधील कारकिर्द त्यांनी इतर कंपन्यांमध्ये केलेल्या कारकि‍र्दीपेक्षा वेगळी आणि यशस्वी ठरली. त्यानंतर त्यांनी त्याच वेगाने आपली काम करण्याची शैली कायम ठेवत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. डिसेंबर 2021 मध्ये अजय बंगा मास्टरकार्डमधून पाय उतार झाले.

अजय बंगा यांच्या आयुष्याला 2023 मध्ये कलाटणी मिळाली. कारण खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अजय बंगा यांचे नाव जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकित केले. तत्पुर्वी, फेब्रुवारी 2015 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अजय बंगा यांनी मोठी जबाबदारी दिली होती. त्यांची व्यापार धोरण आणि वाटाघाटींसाठी अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियूक्त करण्यात आले होते. त्याबरोबर 2020 साली अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना सल्ला देणाऱ्या व्यवसायिक नेत्यांच्या गटाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले होते.

23 फेब्रुवारी 2023 रोजी जो बिडेने यांनी बंगा यांना जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी नामांकित केले. अजय बंगा यांच्यासाठी ही सर्वात मोठी संधी चालून आली होती. त्यांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली आणि 3 मे 2023 रोजी जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 2 जून 2023 रोजी त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर हवामान बदल, जागतिक आर्थिक विकास आणि जगातील सर्वात मोठी समस्या गरिबी कमी करण्यासाठी उपाय योजना करणे, या सारख्या समस्यांवर लक्ष्य केंद्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

अजय बंगा आणि त्यांचे कुटुंब

वाचन आणि शिक्षणाची आवड असणारे अजय बंगा यांचे रिंतू बंगा यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत. 2007 साली अजय बंगा यांनी अमेरिकेचे नागरिक्तव स्वीकरले आहे. अजय बंगा यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी रितू बंगा यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. अजय बंगा यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे त्यांना देशभरात अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच अमेरिकेतील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रमुख पाहूने म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा संबोधित केले आहे.

पुरस्कार आणि अजय बंगा

अजय बंगा यांना 2016 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यापार आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कमागिरीमुळे त्यांना हा पुरस्कार भारत सरकारने बहाल केला. त्याबरोबर अजय बंगा यांना अनेक वेळा फॉरेन पॉलिसिचे टॉप ग्लोबल थिंकर्सच्या यादीत समाविष्ट केले आहे. मास्टरकार्डमधील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अजय बंगा यांना 2016 साली Fortune’s Business Person Of The Year म्हणून निवड झाली. विकसनशील देशांमध्ये बँकिंग क्षेत्राचा विस्तार करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांची Fortune’s Business Person Of The Year म्हणून निवड झाली होती.

Premchand Roychand – स्टॉक मार्केटचा बेताज बादशाह

2023 मध्ये अजय बंगा यांना न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशन ग्रेट इनिग्रंट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी टाईम मॅगझिनने ‘Time 100 Climate’ व्यक्तींच्या यादीत बंगा यांचा समावेश केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अजय बंगा यांना व्हाईट हाऊसमध्ये राज्य भोजनासाठी आमंत्रित केले होते.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment