गेल्या काही वर्षांमध्ये लग्न आणि घटस्फोट या सर्व गोष्टी अगदी कॉमन झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे. घटस्फोट, पोडगी, हुंडा, छळ असे अनेक शब्द गेल्या काही वर्षांमध्ये तुमच्या कानावर सतत पडत असतील. या सर्व प्रकारामुळे मानसिक दबावाखाली येऊन अनेक तरुण-तरुणींनी आपलं जीवन सुद्धा संपवल्याचा घटना घडल्या आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर मानसिक तणाव निर्माण होणं साहजिक आहे. परंतु एका तरुणाने चक्क घटस्फोटाचा आनंद साजरा करत दुग्धाभिषेक करून घेतला आहे आणि केक सुद्धा कापला आहे. याचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बिरादर डी के नावाच्या एका तरुणाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 25 सप्टेंबर रोजी शेअर केला आहे. तरुणाच्या आईने मुलाला दुधाची आंघोळ घातळी असून त्याने Happy Divorce असं लिहिलेला केक सुद्धा कापला आहे. “कृपया आनंदी राहा आणि स्वत:चा आनंद साजरा करा. 120 ग्रॅम सोने आणि 18 लाख कॅश घेतले नाही तर दिले आहेत. सिंगल आहे, आनंदी आहे, आझाद आहे.” असं कॅप्शनमध्ये लिहित त्याने आपला आनंद साजरा केला आहे.
View this post on Instagram