Zilla Parishad Election – उमेदवारांची लगबग, वाईत पाच अर्ज दाखल; एका गटाची पाटी अजूनही कोरीच, जाणून घ्या एका क्लिकवर

जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) आणि पंचायत समिती निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. वाई तालुक्यातही निवडणुकीची पडघम वाजले असून आज (21 जानेवारी 2026) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, मंगळवारपर्यंत (20 जानेवारी 2026) जिल्हा परिषदेसाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मात्र, एका गणामध्ये अद्याप जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

वाई तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी यशवंतनगर, बावधन, भुईंज व ओझर्डे हे चार गट आहेत. या चार गटांमधून मंगळवारपर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. यशवंतनगर गटातून चंद्रकांत धोडिंबा शेलार, भाऊसाहेब सूर्यकांत सपकाळ आणि सागर विलास पवार यांनी अर्ज भरला आहे. तर बावधन गटातून सत्वशील प्रताप भिलारे, ओझर्डे गटातून सुजाता शामराव गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, भुईंज गटात अद्याप एकही अर्ज जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेला नाही.

पंचायत समिती पाच गणांचा विचार करत मंगळवारपर्यंत सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अभेपूरी गणात भाऊसाहेब सूर्यकांत सपकाळ, दीपक विष्णू काकडे व कृष्णा भागोजी नवघणे, शेंदूरजणे गणात नंदा अशोक नवघणे, बावधन गणात संतोष यादवराज पिसाळ, केंजळ गणात रेखा जितेंद्र जाधव आणि यशवंतनगर गणात स्वप्निल अशोक गायकवाड या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त ओझर्डे, भुईंज व पाचवड गणांमधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!