दिवाळीचे (Diwali 2025 Maharashtra) औचित्य साधत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तशी घोषणा केली असून 40.61 कोटींचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाची सुरुवात अंगणावडीमधून होते. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अंगणवाडी सेविकांच्या जोडीने मदतनीस सुद्धा महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आपली जबाबदारी चोख पार पाडत असतात. असंख्य अडचणींचा सामना करत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुलांच्या विकासासाठी मेहनत घेत असतात. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आणची भूमिका आहे, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
(सोर्स – महासंवाद)