Satara Vishesh मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे सरकार खडबडून जागं झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर 2025) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे या सेवा पंधरवडा कालावधी कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या माध्यमातून प्रेस नोट जारी करण्यात आली आहे.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांमधील आठ गावांमध्ये विविध दिवशी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 26 तारखेपासून वाई तालुक्यातील बावधन गावातून या शिबीराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सोमवारी (29 सप्टेंबर 2025) वाई तालुक्यात वासोळे, खंडाळा तालुक्यात खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात भौसे गावात शिबीराचे आयोजन केले जाईल. त्यानंतर मंगळवारी (30 सप्टेंबर 2025) महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावात शिबीर पार पडेल. तर बुधवारी (01-10-2025) वाई तालुक्यात बलकवडी, खंडळा तालुक्यात विंग आणि महाबळेश्वर तालुक्यात लाखवड गावाता शिबीराचे आयोजन करण्यात येईल.
सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबीर ठिकाणी उपस्थिती राहून कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहान उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी केले आहे.
(सोर्स – प्रेसनोट)
Satara Gazetteer – सातारा गॅझेट म्हणजे काय? लागू झाल्यास कोणाला आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.