Songe Miravnuk Ozarde – गावकुसातील जिवंत परंपरा! बावधनचं थरारक बगाड आणि ओझर्डेचा रंगतदार सोंगे उत्सव

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra) आणि ओझर्डे गावचा सोंगे (Songe Miravnuk Ozarde) उत्सव म्हणजे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा खजिनाच. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही बगाड यात्रा आजही लोकांना तितक्याच उत्साहाने आकर्षित करते. बावधनच्या बगाड यात्रेशी अगदीचा जवळचा संबंध असलेला ओझर्डेचा सोंगे उत्सव म्हणजे अद्भुत … Read more

Veer Shiva Kashid history – स्वराज्यासाठी हसत हसत मरण पत्करणारे वीर: शिवा काशीद

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी, त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारी असंख्य माणसं होऊन गेली. मराठा इतिहासातील काही बलिदाने अशी आहेत, की ती केवळ घटना नसून प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरतात. त्यांचे बलिदान भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. अशाच अद्वितीय … Read more

लेख – एक गाव – एक संघ! अंतिम फेऱ्यांचा बादशाह वयगांव; सलग 8 स्पर्धांमध्ये विजयी गुलाल

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< “आमची ऐकी हेच आमचं बळ” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक वयगांवकराच्या मनात बसलेली भावना आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये राहून, वेगवेगळ्या भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असूनही जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून मुलं एकत्र येतात आणि वयगांवचा झेंडा उंचावण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतात. या एकीमुळेच आज वयगांव संघ … Read more

Importance of Voting – आजचं मत उद्याचं भविष्य ठरवतं! पैशांसाठी चुकाल तर पुढची पाच वर्ष भोगावी लागतील, वाचाच…

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर महानगरपालिका निवडणुकीचं बिगूल जेव्हा वाजलं तेव्हापासूनच उमेदवारांची पळवापळवी आणि पैशांच्या जोरावर बिनविरोध विजयी उमेदवरांचा धमाका सुरू झाला. राडा, हाणामारी, पैशांच्या बॅगा याचा धुडगूस गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राने अनुभवला. भाड्याची माणसं घेऊन प्रचाराच्या फैरी पार पडल्या. आता प्रचाराच्या तोफा शांत झाल्या असून मतदान (Importance of Voting) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. … Read more

Sant Dnyaneshwar Maharaj Reda Samadhi Mandir – चला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रेडा समाधीचे दर्शन घेऊया…

> गणेश सुरेखा मारूती वाडकर  येऊनिया उतरिले आळेचिये बनी। पशु तये स्थानी शांत जाहला।। असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील श्री रेडा संजीवन समाधीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Reda Samadhi Mandir) वर्णन आपल्या अभंगामध्ये केलं आहे. जुन्नर तालुक्यातील आळे गावात आपल्याला या श्री रेडा समाधीचे दर्शन घेता येते. ही श्री रेडा समाधी अशी एकमेव समाधी … Read more

International Men’s Day – अरे रडायला तू काही मुलगी आहेस का… समाजाने दाबलेली पुरुषांची एक अबोल वेदना

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर अरे काय रडतोस… पुरुषासारखा पुरुष ना तू, रडतोय काय… मुलांनी रडायचं नसतं… रडायला तू काही मुलगी आहेस का?… ही वाक्य प्रत्येक पुरुषाच्या मनात एखाद्या धारधार तलवारीसारखी हृदयातून आरपार गेली आहेत. ही मानसिक जखम म्हणजे पुरुषाचं पुरुषत्व, ही समाजाने पुरुषाला दिलेली अबोल ओळख आहे. परुष रडला तर त्याच्यावर टोमण्यांच्या रुपात वाक्यांचे … Read more

Moroshicha Bhairavgad – धडधड धडधड… रॅपलिंगचा थरार अन् महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात अवघड दुर्ग आम्ही सर केला

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर धडधड धडधड… जेव्हा गड चढायला सुरुवात केली तेव्हा आमच्या हृदयाची अवस्था अशीच झाली होती. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. गड चढायला अवघड होता. एक चूक आणि थेट गडावरून खाली, अशा प्रकारची गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्यांची रचना होती. परंतू मनातून पूर्ण निश्चय केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होता … Read more

Wai Ganpati Mandir- ढोल्या गणपतीचा इतिहास काय आहे? मंदिर कोणी बांधल? वाचा…

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर वाई हे ऐतिहासिक शहर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी “दक्षिणेची काशी” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानावर वाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. याच वाईमध्ये छोठीमोठी अशी शंभराहून अधिक प्राचीन मंदिरे (Wai Ganpati Mandir) आहेत. या सर्व मंदिरांमध्ये … Read more

PSI Success Story in Marathi – आईने पाहिलेलं स्वप्न जेव्हा लेक सत्यात उतरवते, फौजदार शिवानी मोरे यांची यशोगाथा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< आपल्या मुलीने किंवा मुलाने यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन विराजमान व्हावं, ही सर्व आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. एक काळ असा होता जेव्हा शिक्षणाची बोंब होती, शिक्षणाबद्दल उदासीनता होती, पुरुषांनी काम करायचं आणि महिलेने घर सांभाळायच ही परंपरा पूर्वापार चालत होती. याच परंपरेतून तुमचे आमचे आई-वडील पुढे आले. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता … Read more

लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीने मैदानात नव्हे तर आता मैदानाबाहेर सर्वांनीच कौतुक करावं अशी कामगिरी केली आहे. तिने एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे अनेक निष्पाप जीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमासाठी ज्वाला गुट्टाने मागील चार महिन्यांपासून अनेकवळा सरकारी रुग्णालयाच्या चकरा मारल्या आणि जवळपास 30 लिटर ब्रेस्ट मिल्क … Read more

error: Content is protected !!