Wai Nagar Parishad Election – वाई नगरपरिषद निवडणूक, 72.98 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

वाई नगरपरिषद निवडणुकीसाठी (Wai Nagar Parishad Election) सोमवारी (2 डिसेंबर 2025) 34 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सध्या थंडीचा तडाखा सुरू असल्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अगदीच तुरळक स्वरुपाची होती. मात्र, दुपारच्या सत्रात वयोवृद्धांसह तरुणांनी सुद्धा मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपला हक्क बजावला. 31,763 पैकी 23,182 म्हणजेच 72.98 टक्के मतदान दिवसभरात झाल्याची … Read more

Wai Nagar Parishad Election- एन थंडीत गरमागरम वातावरण! आज 34 केंद्रांवर मतदान, 65 उमेदवार रिंगणार

वाईमध्ये (Wai Nagar Parishad Election) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गरमागरम वातावरण वाईकरांना अनुभवायला मिळत आहे. याच गरमागरमीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडावी म्हणून 264 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांचीही गस्त वाढवण्यात आली असून 34 केंद्रांवर आज (2 डिसेंबर 2025) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडावी … Read more

Panchgani News – छत्री निशाणी हाती घेऊन युवा नेतृत्व गणेश कासुर्डे मैदानात; विकासासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा

पाचगणीतील (Panchgani News) स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व म्हणून गणेश कासुर्डे छत्री निशाणी घेऊन मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. प्रामाणिक कार्यपद्धती, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि सर्वसमावेशक विचारसरणी यांच्या बळावर कासुर्डे यांनी मतदारांची दारोदारी भेट घेत संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पाणीपुरवठा, रस्ते-विकास, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा आणि युवांसाठी … Read more

Pratapgad Fort – अफजलखान कबर परिसरात गेल्यास कायदेशीर कारवाई होणार! प्रतिबंध आदेश जारी

प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायथ्याला असणाऱ्या अफजलखानाच्या कबर परिसरात जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तसे आदेश जारी केले आहेत. तुषार दोशी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतापगड येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात 26 नोव्हेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जाण्यास बंदी … Read more

Wai News – स्व. यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा! वयगांव ZP शाळेच्या रुद्र आणि सोहमची जिल्हास्तरासाठी निवड

सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वाई तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विध्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वयगांवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत शाळेतील सहा विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले होते.  लांब … Read more

Wai Municipal Council Election – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ, पाहा Photo

वाई (Wai Municipal Council Election) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ गंगापूर येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या पवित्र दर्शनाने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

Wai News – जेव्हा सरपंच स्वत: गांडूळ खत बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात, हा Video पाहाच

उपक्रमशील गाव म्हणून सध्या वाई (Wai News) तालुक्यात वयगांव गावाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. याच उपक्रमात आणखी एका उपक्रमाची भर पडली. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार यांनी गांडूळ खत (Gandul Khat) बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तसेच गांडूळ खताच्या फायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे ड्रम रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ग्रामपंचायत वयगांवला देण्यात … Read more

Wai News – वाई आगारातील चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स केली परत

प्रवास करत असताना अनावधानाने बऱ्याच वेळा आपल्या मौल्यवान वस्तू या गाडीमध्येच राहतात. अशा परिस्थितीत आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. परंतू संबंधीत गाडीचे चालक आणि वाहक जर प्रामाणिक असतील, तर वस्तू कितीही मौल्यवान असो ती हरवण्याचा धोका अजिबात राहत नाही. याचाच प्रत्यय पारगाव-खंडाळा येथील भोसले कुटुंबाला आला आहे. एसटी बसमध्ये दागिने, मोबाईल … Read more

Wai News – वयगांवकरांच्या एकीचे बळ; मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून बंधाऱ्याचे बांधकाम, पाहा Photo

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव) सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी … Read more

Radha Buffalo Satara – माण तालुक्यातील ‘राधा’म्हशीची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद

माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’म्हैशीची (Radha Buffalo Satara) सध्या देशात नव्हे तर जगभरात चर्चा आहे. उंचीने कमी असणारी ही म्हैस सध्या शेतकर्‍यांसह सर्वांच्या आकर्षणांच केंद्रबिंदु ठरत आहे. त्यातच तिची आता जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून Guinness Book of World Record मद्ये नोंद झाली आहे. ‘राधा’ची उंची फक्त 83.8 सेंमी इतकी म्हणजेच 2 फुट 8 इंच असून … Read more

error: Content is protected !!